आवळा आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेच पण त्यासोबतच त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर आहे की तो आपल्या त्वचा आणि केसाशी संबंधित सर्व समस्या दूर करू शकतो. दररोज सकाळी आवळा खाल्ल्याने शक्तिशाली फायदे होतात जे जाणून घेतल्यावर तुम्ही तुमच्या आहारात आवळ्याचा समावेश करण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही. आवळ्यामुळे तुमच्या त्वचे सोबत केसही सुंदर होतात. जाणून घेऊया आवळा खाण्याचे फायदे.
कोलेजन वाढेल
कोलेजन आपल्या त्वचेची रचना टिकवून ठेवण्यास आणि त्वचेच्या नवीन पेशी तयार करण्यास मदत करते. कारण आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. जे कोलेजन तयार करण्यास मदत करते आणि आपल्या त्वचेची लवचिकता राखण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच जर तुमच्या चेहऱ्यावर बारीक रेषा असतील तर त्या कमी होण्यासही मदत होते.
केस गळती कमी करते
आवळा व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडन्स, टॅनिन, कॅल्शियम आणि अँटी-बॅक्टेरियल्सने समृद्ध आहे. ज्यामुळे आवळा केस मजबूत करण्यास आणि सूर्याच्या हानिकार किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतो. त्यासोबतच यातील पोषक घटक आपल्या केसांची चमक टिकवून ठेवतात, केस गळण्यापासून रोखतात आणि केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. तसेच त्यांना पांढरे होण्यापासून रोखण्यास मदत करतात.
टाळू साठी फायदेशीर
केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी टाळूची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे असते. त्यामुळे रोज सकाळी एक आवळा खाल्ल्याने टाळूला खाज सुटण्यापासून आराम मिळतो. तसेच जर तुम्हाला कोंड्यामुळे केस गळण्याची समस्या असेल तर दररोज एक आवळा खाणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
केस आणि त्वचा तरुण ठेवते
केस आणि त्वचा या दोन्हीसाठी आवळा खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावरचे जुने डाग असो किंवा केसांची खुंटलेली वाढ असो. रोज सकाळी एक आवळा खाल्ल्याने तुम्हाला याचे उत्कृष्ट परिणाम नक्कीच मिळतील.
आवळा चेहऱ्यावरील बारीक रेषा कमी करण्याचे आणि सुरकुत्या दूर करण्याचं काम करतोच. पण त्याचबरोबर केसांचं सौंदर्य ही जपतो. दररोज सकाळी एक आवळा खाल्ल्याने तुमचे केस चमकतील आणि मजबूत होतील.