मुंबई | 22 डिसेंबर 2023 : 2020 मध्ये भारतात आलेल्या कोरोना विषाणूने फक्त देशात नाही तर, जगभरात हाहाकार माजवला होता. आता पुन्हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 डोकं वर काढत आहे. दरम्यान, न्यू ईयर पार्टामुळे जभरात लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. अनेक लोक याला कोरोनाच्या नव्या म्हणजे चौथ्या लाटेची सुरुवात मानत आहेत. असं असताना आरोग्य एक्सपर्टचं म्हणणं काय? असा प्रश्न नक्कीच अनेकांना पडला आहे. इतक्या लवकर व्हेरिएंट JN.1 ला चौथीची सुरुवात म्हणणं फार घाईचं ठरेल.. असं आरोग्य एक्सपर्टचं म्हणणं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डब्ल्यूएचओचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांच्या मते, एडेनोव्हायरस, राइनोव्हायरस आणि रेस्पिरेटरी सिन्सायटियल विषाणू यांसारख्या सीझनल फ्लूमुळे होणारे श्वसनाचे आजार साथीच्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. या आजारांची लक्षणं कोरोना संसर्गाच्या लक्षणांप्रमाणेच आहे.
डॉ. के. कोलांडाइसामी यांच्यामते, सार्वजनीक ठिकाणा मास्कचा वापण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मास्कचा वापर केल्यामुळे फक्त कोविड-19 च नाही तर, इतर आजार दूर ठेवण्यासाठी मदत होईल. पण प्रत्येक वेळी मास्कचा वापर करणं गरजेचं नाही. पण गर्भवती महिला, वृद्धा व्यक्ती, आणि लहान मुलांनी मास्कचा वापर करणं महत्त्वाचं ठरणार आहे.
WHO ने कोरोनाची लक्षणं सांगितल्यानुसार, ताप, खोकला, सर्दी, वास न येणे, सतत थकवा येणे… अशी लक्षण कोरोना होण्यापूर्वी दिसून येतात. सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, जुलाब, त्वचेवर पुरळ, डोळे लाल होणे आणि बोटांचा रंग बदलणे यांचा सामावेश आहे. तीन सर्वात गंभीर लक्षणे म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत दुखणे आणि बोलण्यात अडचण जाणवणे
CDC ने सांगितली कोरोनाची लक्षणे- सीडीसीने सांगितल्यानुसार, संसर्ग झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते 14 दिवसांच्या दरम्यान रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे दिसू शकतात. या लक्षणांमध्ये रुग्णाला थंडीसोबत ताप येऊ शकतो आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. एवढंच नाही तर, थकवा, डोकेदुखी, चव आणि वास येणे कमी होणे, घसा खवखवणे, उलट्या किंवा जुलाब, नाक वाहणे आणि स्नायू दुखणे होऊ शकते. अशा परिस्थितीत रुग्णाने ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि डॉक्टरांट्या सल्ल्याने उपचार घ्यावे…