मुंबई: डोळे ही माणसाची ओळख आहे. त्यामुळे आकर्षक डोळे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. अशातच आज आम्ही तुमच्यासाठी “दही अंडर आय मास्क” घेऊन आलो आहोत. दही आणि हळदीच्या मदतीने हा मास्क तयार केला जातो. दही डोळ्यांना थंडावा देते. त्याचबरोबर हळद आपल्या डोळ्यांखालील काळेपणा दूर करण्यास मदत करते. हा मास्क ट्राय करून तुम्ही जिद्दी डोळ्यांखालील डार्क सर्कल्सपासून सुटका मिळवू शकता. याशिवाय फुगलेल्या आणि थकलेल्या डोळ्यांच्या समस्येवरही तुम्ही मात करू शकता, तर चला जाणून घेऊया दही मास्क कसे बनवावे?
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)