मुंबई : सध्या देशामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाच्या रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच आहे. यासर्व परिस्थितीमध्ये आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. यासाठी चांगला आहार आणि व्यायाम हा सर्वात महत्वाचा आहे. यापेक्षाही महत्वाचे आहे की, यादरम्यान आपण जंकफूडपासून दूरच राहिले पाहिजे. ते खाणे टाळलेच पाहिजे. (Dangerous eating junk food during corona)
काही लोकांना नेहमीच कोल्ड ड्रिंक पिण्याची सवय असते. असे लोक जेव्हा जंकफूड खातात, तेव्हा त्यासोबत कोल्डड्रिंक, आईस टी, कोल्ड कॉफी या सारख्या कोल्ड ड्रिंक पितात. कोल्ड ड्रिंकसह जंकफूड खाल्ल्याने, त्यातील अतिरिक्त चरबी आणि कार्बोहायड्रेट आतड्यांमधे चिकटतात. यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
जंक फूडसह सलाडचे कॉम्बिनेशन आपल्यास विचित्र वाटू शकते. परंतु, कधीकधी चांगल्या आरोग्यासाठी काही तडजोडी करणे अधिक फायद्याचे असते. जंकफूड खाताना त्याच्याबरोबर एक प्लेट सलाड नक्की खा. सलाडमधील टोमॅटो, काकडी, कांदा, बीटरूट, कोबी, ब्रोकोली, लिंबू, मिरपूड आणि मीठ हे घटक खाण्यास स्वादिष्ट आहेतच, पण जंकफूडपासून होणारे नुकसान देखील ते कमी करतात. सलाडमधील फायबर आपण खाल्लेल्या जंकफूडला लवकर पचण्यास मदत करेल.
लाल शिमला मिर्चीत जीवनसत्त्वे सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. कॅप्सिकममध्ये कॅलरी असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. यामुळे आहारात जास्त-जास्त लाल शिमला मिर्चीचा समावेश करा. शिमला मिर्ची खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.
दररोज एक वाटी दही आणि एक ग्लास ताक पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. दही आणि ताकाच सेवन करणे हे सध्याचा परिस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक आहे. कारण कोरोना रूग्णांची संख्या आपल्याकडे झपाट्याने आवडत आहे आणि यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आवश्यक झाले आहे. म्हणून सर्वांनी आपल्या आहारामध्ये दही आणि ताकाचा समावेश करावा. दह्यामध्ये दुधासारखेच पोषक घटक असतात. दह्यामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे दात आणि हाडेही बळकट होतात.
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Dangerous eating junk food during corona)