मुंबई: डोळे ही माणसाची ओळख आहे. त्यामुळे आकर्षक डोळे मिळावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण अनेकांना डोळ्यांखाली डार्क सर्कलची समस्या असते, ज्यामुळे तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्याला ग्रहण लागतं. आज आम्ही तुमच्यासाठी कॉफी अंडर आय मास्क घेऊन आलो आहोत. हा मास्क कॉफी, मध आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलच्या मदतीने तयार केला जातो. त्यामुळे या तिघांचे कॉम्बिनेशन लावल्याने डोळ्यांच्या खालची काळी वर्तुळे काही दिवसांतच नाहीशी होतात. याशिवाय फुगलेल्या आणि थकलेल्या डोळ्यांच्या समस्येवरही तुम्ही मात करू शकता, तर चला जाणून घेऊयात डोळ्यांच्या खाली लावायचं कॉफी मास्क कसं बनवावं.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)