बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पादुकोणने नुकतीच पठाण चित्रपटातील आपल्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत. लाखो लोकांना तिच्या टोन्ड आणि हेल्दी बॉडीचं आकर्षण आहे. इतकंच नाही तर अनेक मुली किंवा महिलांनाही तिच्यासारखं शरीर मिळावं असं वाटतं. दीपिकाचा डाएट प्लॅन आणि फिटनेस रूटीन अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
दीपिका पदुकोणने तिच्या फिटनेस रूटीन आणि डाएट प्लॅनची अनेकदा आपल्या मुलाखतीत चर्चा केली आहे. ती अधूनमधून तिचे आवडते चॉकलेट ब्रेड किंवा घरी बनवलेले दक्षिण भारतीय पदार्थही खात असते. जर तुम्हाला दीपिकाच्या रोजच्या डाएटबद्दल उत्सुकता असेल तर आम्ही तुमच्यासाठी काही माहिती घेऊन आलो आहोत. तिच्या सारखं रूटीन ठेवून तुम्ही तुमचे शरीर तंदुरुस्त बनवू शकता.
दीपिका पदुकोणला कमी चरबीयुक्त दूध किंवा उपमा, इडली किंवा डोसा सारखे कोणतेही दक्षिण भारतीय पदार्थ दोन अंड्यांसह खाणे आवडते. दुपारच्या जेवणापूर्वी ती एक वाटी फळे खाते, नंतर दुपारच्या जेवणासाठी २ चपात्या, मासे आणि ताज्या भाज्या खाते.
दीपिका रिकाम्या पोटी न राहणे पसंत करत असल्याने ती संध्याकाळी स्नॅक्स म्हणून शेंगदाणे आणि फिल्टर कॉफी घेते आणि रात्रीच्या जेवणात चपाती, भाज्या आणि कोशिंबीर खाते. याशिवाय दीपिका दर दोन तासांनी नॅचरल फ्रेश ज्यूस, नारळ पाणी किंवा स्मूदी पिते.
दीपिका आपले शरीर सक्रिय ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करते. तिच्या पर्सनल ट्रेनर यास्मीन कराचीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली दीपिका पिलेट्ससोबत स्ट्रेचिंग करते. यानंतर तिला फ्री हँड वेटचे चार ते पाच सेट करायला आवडतात.
दीपिका आपल्या दिवसाची सुरुवात योगाने करते आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी अर्धा तास चालते. तिचा कोर मजबूत करण्यासाठी आणि तिच्या पूर्ण तंदुरुस्तीवर काम करण्यासाठी प्लॅंक, माउंटेन क्लाइंबर, सिट-अप्स,साइकिल, क्रंच आणि ट्रक जम्प करायला खूप आवडतात.