मुंबई | 12 जानेवारी 2024 : तुम्ही अनेकदा तुमच्या आस-पासच्या व्यक्तींकडून ऐकलं असेल की, रेड वाईनमुळे स्किन उजळते. हे देखील एक कारण आहे ज्यामुळे रेड वाईन पिण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे आणि रेड वाईनची मागणी देखील वाढली आहे. रेड वाईनमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म आहेत, ज्यामुळे पिंपल्स आणि एक्नेची समस्या दूर होते. याशिवाय हे बॅक्टेरिया कमी करण्यासही मदत करते… असं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रेड वाईनमुळे खरंच चेहरा उजळतो का? या प्रश्नाचं उत्तर डॉक्टरांनी दिलं आहे.
दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील डर्मेटोलॉजिस्ट विभागातील वरिष्ठ सल्लागार डॉ. डी.एम. महाजन सांगतात की, यामध्ये रेस्वेराटॉल नावाचे अँटीऑक्सिडंट असते, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. हे अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव दूर करतात. या अँटीऑक्सिडंटच्या अँटी इंफ्लामेटरी गुणधर्मामुळे त्वचेमध्ये कोलेजन तयार होते, ज्यामुळे त्वचेचे वृद्धत्व कमी होते.
डॉ. डी.एम. महाजन सांगतात की, कोणत्याही गोष्टीचं अधिक प्रमाण सेवन करणं धोकादायक होऊ शकतं. रेड वाईन स्किनसाठी गुणकारी आहे. पण रेड वाईनमुळे आरोग्यास मोठा धोका देखील होऊ शकतो. रेड वाईनचं अधिक प्रमाणात सेवन केल्यास स्किन खराब होऊ शकते. अल्कोहोलचं अधिक सेवन डिहाइड्रेशन आणि इंफ्लामेशनचं कारण ठरु शकतं.
रेड वाईन पिण्यासोबतच तुम्ही रेड वाईनने चेहर धुवू देखील शकता. जर तुम्हाला एक्ने किंवा पिंपल्सची समस्या वारंवार होत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी कॉटन बॉल रेड वाईनमध्ये बुडवून एक्ने किंवा पिंपल्सवर लावा. लाल वाइन त्वचेवर 15-20 मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा.
त्वचा किंवा संबंधित समस्या टाळण्यासाठी तुम्ही रेड वाईन वापरत असाल तर त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा, असेही महाजन सांगतात. त्वचेसाठी अनेक जण सौंदर्य प्रसाधणांचा वापर करतात. पण कोणत्याही गोष्टीचा वापर करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या…