Eating Habits: पुरेसा वेळ नसल्याने बकाबका खाऊन पोट भरताय? ही चूक पडू शकते महागात, आजपासूनच बदला सवय!

| Updated on: Jun 16, 2022 | 4:26 PM

बहुतेक लोकांना फास्ट फूड खाण्याची सवय असते. काही लोकांना जेवणाची घाई करण्याची सवय असते. पण फास्ट फूड खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का? होय, फास्ट फूड खाणारे लोक अनेक आजारांना बळी पडतात.

Eating Habits: पुरेसा वेळ नसल्याने बकाबका खाऊन पोट भरताय? ही चूक पडू शकते महागात, आजपासूनच बदला सवय!
खाताना ही चूक पडू शकते महागात, आजपासूनच बदला सवय!
Image Credit source: Tv9
Follow us on

तुम्हाला माहीत आहे का की, चुकीच्या पद्धतीने खाणे (Eating the wrong way) आपल्यासाठी घातक ठरू शकते. असेच एक प्रकरण दिल्लीतून समोर आले आहे, जिथे मोमोज खाल्ल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चुकीच्या पद्धतीने मोमोज खाल्ल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. वास्तविक, चायनीज पदार्थ खाताना (Eating Chinese food) तो गिळत असताना त्याचा काही भाग श्वसनमार्गात अडकला. रिपोर्ट्सनुसार, त्याच्या मृत्यूचे खरे कारण पोस्टमॉर्टममधून समोर आले, ज्यात सांगितले गेले की त्याच्या घशात मोमोज अडकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. असे सांगितले जात आहे की हा तुकडा सुमारे 5×3 सेमी होता. दिल्लीत डॉक्टरांनी हे अन्नच नव्हे तर सर्व पदार्थ खाण्याचा सल्ला दिला आहे. तुम्हीही अन्न खाताना करताय का या चूका.. तर, वेळीच सावध व्हा. कारण या चुका तुमच्या जिवावर बेतून तुमच्या मृत्यूला कारण (The cause of death) होऊ शकतात.

बकाबका खाण्याचे तोटे

खूप घाईने बकाबका अन्न खाल्ल्याने मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. याचे कारण असे की जेव्हा तुम्ही घाईने पटापट जेवता तेव्हा तुम्ही तुमच्या गरजेपेक्षा जास्त खातात. याशिवाय खूप लवकर खाल्ल्याने मेंदूला आवश्यक संदेश मिळत नाही. त्यामुळे आवश्यक हार्मोन्स बाहेर पडत नाहीत. त्यामुळे व्यक्तीच्या इन्सुलिनवर परिणाम होतो. इन्सुलिनच्या प्रभावामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. जपानमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार, जे लोक खूप लवकर अन्न खातात त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक सिंड्रोम होतो. मेटाबॉलिक सिंड्रोममुळे लठ्ठपणा, रक्तातील साखर, उच्च रक्तदाब, मधुमेह यासह हृदयविकाराची शक्यता वाढते.

चायनीज पदार्थांचे तोटे

मोमोज हा त्या चायनीज खाद्यपदार्थांपैकी एक आहे, ज्यांनी गेल्या काही वर्षांत भारतात खूप लोकप्रियता मिळवली आहे. या पदार्थाची चव तर अप्रतिम आहेच, पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत. सर्वात मोठा तोटा म्हणजे हा मैद्यापासून बनवला जातो, जो आरोग्यासाठी चांगला मानला जात नाही. दुसरे म्हणजे, हे जंक फूड म्हणून तयार केले जाते आणि यामुळे आपल्याला अनेक जीवघेणे आजार होऊ शकतात. तसेच त्यात वापरल्या जाणाऱ्या मसाल्यांमुळे अॅसिडिटीची समस्या निर्माण होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

लोक अनेकदा ही चूक करतात

अन्न न चघळता गिळणे आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जाते. ही चूक बहुतेक 7 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांकडून केली जाते. त्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे, मुलाच्या विकासात अडथळा आणला जातो. दुसरीकडे, या मुलांच्या शरिरावर लवकर चरबी वाढू लागते, त्यांच्या या स्थितीमागे कुठेतरी असे अन्न खाण्याशी संबंधित चूक असू शकते.

अन्न नीट चावून खा

आरोग्य विभागाने जारी केलेल्या अॅडव्हायझरीमध्ये अन्न खाताना नेहमी चर्वण करून खावे, असे म्हटले आहे. असे केल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि ते घशात अडकत नाही. एवढेच नाही तर अन्नाचे पचन व्यवस्थित झाले तर तुमचा मेटाबॉलिक रेटही सुधारतो. काही लोकांना अशी सवय असते की ते जेवताना घाईघाईत अन्न चघळत नाहीत, त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात, त्यापैकी लठ्ठपणा सामान्य आहे.