केस गळती रोखण्यासाठी ‘हे’ उपाय करा

| Updated on: Apr 22, 2023 | 8:01 PM

तुम्हीही अशाच समस्येशी झगडत असाल तर आज आपण त्यावर मात करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय अवलंबले पाहिजेत. केस गळण्याच्या समस्येवर मात कशी करता येईल यावर बोलूयात.

केस गळती रोखण्यासाठी हे उपाय करा
Hair care
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई: वयानुसार केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण बाजारात विकल्या जाणाऱ्या रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. पण दीर्घकाळ या उत्पादनांचा वापर केल्यास तुमचे केस खराब होऊ शकतात. जर तुम्हीही अशाच समस्येशी झगडत असाल तर आज आपण त्यावर मात करण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय अवलंबले पाहिजेत. केस गळण्याच्या समस्येवर मात कशी करता येईल यावर बोलूयात.

तांदळाचे पाणी

तांदूळ धुतल्यावर तांदळाचे पाणी आपण टाकून देतो. पण हे पाणी तुमच्या केसांसाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. ते पाणी फेकण्याऐवजी त्याने हळूहळू केस धुवा. असे केल्याने केसगळती कमी होईल.

खोबरेल तेल

आंघोळीनंतर सर्वप्रथम केस हवेत वाळवावेत. यानंतर त्यांना कोणत्याही तेलाने मसाज करा. केसांसाठी नारळाचं तेल उत्तम मानलं जातं. यामुळे केस गळण्यापासून बचाव होतो आणि त्यांच्यात चमक निर्माण होते.

कडुनिंब

कडुनिंब केसगळती रोखण्याचे काम करते. याचा वापर करण्यासाठी आपल्या डोक्यातील केसगळती कमी करण्यासाठी कडुनिंबाची पावडर एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घालावे. यानंतर दोन्ही मिसळून द्रावण तयार करा आणि नंतर डोक्याच्या टाळूवर सोडा. साधारण ४० मिनिटांनी थोडेसे शॅम्पू लावून केस स्वच्छ करावेत.

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)