पावसाळा सुरू झाला आहे आणि या ऋतूतील सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, कपड्यांची दुर्गंधी (The stench of clothes) आपण कितीही वेळा आपले कपडे धुतले तरी त्यातून सुगंधा ऐवजी कुबट वास येतो. असे हवेतील आर्द्रतेमुळे (Due to the humidity in the air) होते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या कपड्यातून वास येऊ लागतो. असे, कपडे काही वेळ उन्हात ठेवल्यास तो वास जातो, परंतु कपड्यांमधून येणारा हा वास कायमचा निघून जावा, अशी अनेकांची इच्छा असते. जर तुम्हालाही पावसाळ्यात कपड्यांमधून येणाऱ्या या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्ही काही सोप्या युक्त्या (Simple tricks) वापरून पाहू शकता. आपल्यापैकी बरेच जण वापरलेले कपडे थेट मशिनमध्ये टाकत असल्याचे दिसून येते. म्हणजेच, कपडे काढून थेट मशिनमध्ये फेकून दिले जातात. असे केल्यास पावसाळ्यात तुमच्या कपड्यांना दुर्गंधी येईल. ही दुर्गंधी टाळण्यासाठी कपडे हँगरवर लटकवा किंवा मोकळ्या जागी वाळत घाला.
लिंबू हे नैसर्गिक आम्लयुक्त आहे म्हणून ते वास येणारी बुरशी नष्ट करू शकते. कपड्यांना दुर्गंधीपासून वाचवण्यासाठी पाण्यात लिंबाचा रस मिसळा आणि त्यात कपडे बुडवून ठेवा. काही वेळाने ते कपडे धुवा. किंवा ज्या ठिकाणी दुर्गंधी येते त्या कपड्यांवर लिंबाचा रस लावा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा.
खाद्यपदार्थांमध्ये वापरण्यासोबतच घरात ठेवलेल्या व्हिनेगरचा वापर कपड्यांचा दुर्गंध दूर करण्यासाठीही केला जातो. वास्तविक, व्हिनेगरचे स्वरूप देखील आम्लयुक्त असते आणि ते दुर्गंधी निर्माण करणारे बॅक्टेरिया मारतात. कपड्यांचा वास दूर करण्यासाठी, दुर्गंधीयुक्त पृष्ठभागावर व्हिनेगर घाला आणि नंतर साध्या पाण्याने कपडे धुवा. कपड्यांचा दुर्गंध निघून गेल्याचे दिसेल.
खाण्याचा सोडा कपड्यांमधून दुर्गंधी आणि वास आणणारे जंतु (बॅक्टेरिया) मारतो. एक बादली पाण्यात 1 चमचा खाण्याचा सोडा टाका आणि त्यात कपडे थोडा वेळ भिजत घाला. त्यानंतर त्यांना साध्या पाण्याने धुवा.
तुमच्या वॉर्डरोबमध्ये खडू किंवा सिलिकॉन पाऊच ठेवा खडू किंवा सिलिकॉन पाऊच कपड्यांचा गंध शोषून घेऊ शकतात, म्हणून तुमचे कपडे कोरडे आणि सुगंधित करण्यासाठी तुमच्या वॉर्डरोबमध्ये खडू किंवा सिलिकॉन पाऊच ठेवता येऊ शकते. असे केल्याने कपड्यांना वास येणार नाही.
पावसाळ्यात बाहेर ऊन कमी पडतं, त्यामुळे कपडे मशिनमध्ये वाळवण्यापेक्षा हवेशीर खोलीत वाळत घाला. जर खोलीत खिडकी नसेल तर, खेळती हवा येणार नाही. अशा वेळी कपडे वाळत घालताना पंखा सुरु ठेवा.
मद्य म्हणून प्रचलीत वोडका हवामानातील आर्द्रतेमुळे येणारा वास कमी करू शकतो. कपड्यांचा वास दूर करण्यासाठी थोडा वोडका घ्या आणि त्यात थोडे पाणी मिसळा. यामुळे ते पातळ होईल आणि दुर्गंधी असलेल्या ठिकाणी थेट लावा. वास काही वेळात नाहीसा होईल.
कपडे धुण्यासाठी चांगला सुगंधित डिटर्जंट पावडर वापरा. फॅब्रिक सॉफ्टनरमध्ये कापड सुमारे 10-15 मिनिटे भिजवा जेणेकरून कपड्यांना वास येणार नाही.
कपड्यांमध्ये ओलावा असल्यास कुबट वास येऊ शकतो, त्यामुळे दुर्गंधीपासून कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी कपडे कोरड्या जागी ठेवा. यामुळे तुमच्या कपड्यांना वास येणार नाही. तर, डिटर्जेंटचा सुगंध येईल.
वारंवार तेच ते कपडे वापरु नका. अनेक वेळा लोक एकापेक्षा जास्त वेळा कपडे घालतात त्यामुळे त्यात जंतु (बॅक्टेरिया) वाढतात आणि त्यांना दुर्गंधी येऊ लागते. (Do clothes stink in the rain Then know the bad smell of the clothes you are wearing easy way to get rid of the bad smell of the clothes)