मुंबई : लहान मुलांना आपण आहारात खाण्यासाठी काय देतो हे सर्वात महत्वाचे आहे. कारण त्यामुळे मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. चुकीच्या आहारामुळे मुलांची वाट खुंटू शकते जर तुम्ही लहान मुलांना चुकीचे पदार्थ खायला दिलेत तर त्यांच्या आरोग्यावर याचे घातक परिणाम होऊ शकतात. बऱ्याचवेळा पालकांना सुद्धा माहिती नसते की, लहान मुलांना काय खाऊ घालणे योग्य आहे. चलातर मग बघूयात लहान मुलांना कुढल्या खाद्यपदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे. (Do not give these foods to children)
पाच वर्षाखालील मुलांना कार्बोनेटेड पेय, चहा, कॉफी यासारखे कॅफेन युक्त पेय यापासून दूर ठेवले पाहिजे. तर 5 ते 9 वर्षांपर्यंत शाळेत जाणाऱ्या मुलांचे चहा आणि कॉफीचे प्रमाण हे अर्धा कप ठेवले पाहिजेत. तसेच 10 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना दिवसाला 1 कप चहा किंवा कॉफी प्यायला हवी. खाद्य किंवा पेय पदार्थांचा थेट संबंध हा शरीरातील मासपेशींशी होतो. त्यामुळे लहान मुलांना हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. तसेच कॅफेनयुक्त पेय प्यायल्याने लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होतो असेही आईएपीने निर्देश दिले आहेत.
दोन वर्षांपासून 5 वर्षापर्यंतची मुलांना फळांचा रस देत असाल, तर त्याचे प्रमाण दर दिवशी 125 मिली असावे. तसंच जर 5 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना जर तुम्ही फळांचा रस देत असाल, तर तो एक कप म्हणजेच दर दिवशी 250 मिली असावे. लहान मुलांना एका ठराविक प्रमाणात ताजा फळांचा रस द्यावा. हवाबंद किंवा ताज्या फळांच्या रसात साखर आणि कॅलरीचे प्रमाण अधिक असते. त्या तुलनेत फळ हे मांसपेशी विकसित करण्यास मदत करतात.
लहान मुलांची किडनी पूर्णपणे विकसित झालेली नसते म्हणून जास्त प्रमाणात मीठ खाणे त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकते. बाळाला जास्त मिठाची सुद्धा आवश्यकता नसते. त्यांच्या शरीराला दिवसाला 1 ग्रॅम पेक्षा कमी मीठ मिळाले तरी चालते. हे प्रमाण त्यांना आईच्या दुधातून मिळते. याशिवाय साखरेचे सेवन सुद्धा घातक ठरू शकते खास करून प्रक्रिया केलेली साखर कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल असतात. साखरेमुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होऊ शकते म्हणून एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळाला साखर देऊ नका.
लहान मुलांना द्राक्ष खायला दिले जाते. पण असे करणे घातक ठरू शकते कारण बाळाने द्राक्ष पूर्ण गिळल्यास मोठी समस्या उद्भवू शकते. बाळाला नेहमी छोट्या छोट्या तुकड्यांमध्येच पदार्थ भरवावेत. बाळ 8 महिन्याचे झाल्यावर तुम्ही त्याला अंडी खायला देऊ शकता. त्याला केवळ अंड्यातील पिवळा भागच खायला द्यावा. बाहेरील पांढऱ्या भागामुळे बाळाला अॅलर्जी होऊ शकते.
संबंधित बातम्या :
Warm Water Benefits | केवळ वजन नियंत्रणच नव्हे तर, गरम पाण्यामुळे शरीराला होतील अनेक फायदे!https://t.co/z1w6xfCCBd#WarmWater #healthylifestyle #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(Do not give these foods to children)