मुंबई : कॉफीमध्ये मोठ्या प्रमाणात अँण्टिऑक्सिडण्टस असल्याने याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो. तसंच कॉफी त्वचेसाठी ही खूप गुणकारी आहे. त्यामुळे आता कॉफीचा वापर चेहऱ्यावर स्क्रब, फेस पॅक आदीसाठी केला जातो. मात्र हे स्किन केअर तयार करताना कॉफी कशासोबत वापरावी याला महत्त्वं आहे. कारण जर ती चुकीच्या पदार्थांसोबत वापरण्यात आली तर त्याचा परिणाम स्किनवर होतो.
1. कॉफी-नींबू – चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी कॉफीचा वापर केला जातो. त्यामुळे जर चेहरा उजळावा यासाठी अनेक जण कॉफी आणि निंबू असा फेस पॅकचा वापर करतात. मात्र तज्ज्ञांच्या मते यामुळे स्टेप स्किनचं मोठं नुकसान होतं. त्वचेवर पुरळ आणि कोरडेपणा येतो.
2. बेकिंग सोडा– कॉफी – बेकिंग सोडा आणि कॉफीचा एकत्र वापर हा स्किनसाठी नुकसानदायी आहे. बेकिंग सोड्यामुळे त्वचेचं मोठा प्रमाणात नुकसान होतं.
3. कॉफी आणि टूथपेस्ट – तुम्हाला माहिती आहे टूथपेस्टचा अजून एक वापर आहे. टूथपेस्ट त्वचेचा सौंदर्य वाढविण्यासाठी उपयोग केला जातो. मात्र कॉफी आणि टूथपेस्ट एकत्र वापरल्यास चेहऱ्यावर केमिकल रिएक्शन येऊ शकते.
4. कॉफी आणि मीठ – हे कॉम्बिनेशनही चेहऱ्यासाठी घातक आहे. यामुळे चेहऱ्यावर खाज सुटू शकते. त्यामुळे चुकूनही तज्ज्ञांच्या मते हे स्क्रब चेहऱ्यासाठी वापरू नका.
1. एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा कच्चे दूध मिक्स करा आणि 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा.
2. एक चमचा कॉफी पावडर आणि एक चमचा मध यांचं पॅक बनवा. आणि हे पॅक साधारण 15 मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर हा मास्क कोमट पाण्याने स्वच्छ करावा.
3. एक मोठा चमचा साखर आणि एक चमचा कॉफी पावडर, दोन चमचे नारळ तेल हा स्क्रब चेहऱ्याला लावा. आणि पाच मिनिटांनतर चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ धुवून टाका.