मुंबई : अनेक महिला आणि पुरुष केस गळतीची समस्येमुळे त्रस्त (Common Cause of Hair Loss) असतात. सुरुवातीला केस गळायला लागल्यावर आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. मात्र त्यानंतर केस गळतीची समस्या वाढते आणि हळूहळू टक्कल पडायला (Common Cause of Hair Loss) लागते. काही ठराविक वयानंतर केस गळणे ही सामान्य बाब आहे. पण आपल्या नियमित सवयींमुळे केस गळतीचे प्रमाणात वाढते. या सवयींमध्ये बदल केल्यास केस गळण्याचे प्रमाण कमी होऊ (Common Cause of Hair Loss) शकते. जर तुम्ही दिवसभर केस मोकळे सोडत असाल तर रात्री झोपताना केसांची वेणी घालून झोपा. (Do these things to eliminate hair loss)
-तुमच्या नियमित खाण्या-पिण्याच्या सवयीमुळेही केस गळतात. बाहेरील तेलकट, फास्ट फूट यासारखे अनेक पदार्थांचे शरीराप्रमाणे केसांवरही विपरित परिणाम होतो. तुमच्या रोजच्या जेवणात प्रोटीन आणि आयन या घटकांची कमी असेल तर केस गळतीचे प्रमाण वाढते.
-केस गळतीचे कारण तुमची केस विंचरण्याची पद्धतही असू शकते. काही जण केसांचा गुंता झाल्यास केस विंचरताना ते खेचतात. त्यामुळे ते तुटतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, केस विंचरताना ते आरामात विंचरा, त्यांना मुळापासून ओढू नका. यामुळे केस कमजोर होऊन ते तुटतात.
-रात्री झोपण्यापूर्वी टाळूची मालिश करणे खूप महत्वाचे आहे. असे केल्याने केसांच्या टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुरू होईल. हे आपले केस निरोगी आणि जाड बनवेल. केसांमध्ये बोटांनी मसाज करणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय, तुम्ही शैम्पू करण्याच्या 2 तास आधी गरम तेलाने मालिश केली पाहिजे. असे केल्याने केस निरोगी, जाड आणि लांब होते.
-केस चमकदार आणि निरोगी राहण्यासाठी झोपेच्या आधी केसांना सीरम चांगला लावावा. रात्री झोपायच्या आधी हेअर सीरम लावणे खूप फायदेशीर आहे.
संबंधित बातम्या :
तुम्हीसुद्धा सकाळी नाश्त्यामध्ये ‘पोहे’ खाता का? मग जाणून घ्या आरोग्यावर काय होतो परिणाम!
Good fat vs Bad fat : फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळताय, फायद्यांपेक्षा तोटे जास्त!
(Do these things to eliminate hair loss)