मुंबई : देशात मधुमेह असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. भारतातील सुमारे 5 कोटी लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. बर्याच तज्ञांचे मत आहे की नियमित योगाभ्यास केल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. योगा केल्याने रक्त परिसंचरण चांगले आहे. वजन वाढणे, ताणतणाव आणि उच्च रक्तदाब यासारख्या मधुमेहामुळे होणार्या समस्या कमी करण्यास योगा करणे फायदेशीर आहे. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही हे तीन योगसन तुम्ही करू शकता. (Do yoga to control diabetes)
धनुरासन
पाठदुखीच्या समस्येवर धनुरासन अतिशय फायदेकारक ठरते. या आसनामुळे पाठदुखीची समस्या कमी होते. विशेष म्हणजे धनुरासन केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळते. धनुरासन करण्यासाठी आधी उपडी होऊन ताठ झोपावे. दोन्ही हात आणि पाय सरळ रेषेत ताणावे. मग दोन्ही पाय उलट्या दिशेने वर उचलून दोन्ही हातांनी ताणून धरा. यादरम्यान शरीरावर थोडा ताण देऊन, शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे करा. धनुष्याप्रमाणे शरीर ताणले जात असल्यानेच या आसनाला धनुरासन म्हणतात. 10 मिनिटे या आसनमुद्रेत राहण्याचा प्रयत्न करा. हर्निया, अल्सर आणि हृदयरोग असलेल्या लोकांना हे आसन करु नये.
चक्रासन
हे आसन करण्यासाठी आपल्या पाठीवर अगोदर झोपावे लागेल. त्यानंतर दोन्ही हात आणि पाय जमिनीवर ठेवा आणि आपले संपूर्ण शरीर पाय आणि हाताच्या आधारे उचला. यामुळे अर्धा गोलाकार तयार होईल. हे आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. हे आसन केल्यावर पाठ, कंबर, पोट, हात आणि पायांवर थोडा ताण येतो. साधारण वीस मिनिटे हे आसन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. आसनादरम्यान कोणत्याच प्रकारची हालचाल करायला नको. विशेष टिप म्हणजे हे आसन करताना कोणालाही बोलणे टाळा. हे आज केल्याने दोन प्रमुख फायदे होतात. एक म्हणजे मधुमेह नियंत्राणात राहतो. दुसरे म्हणजे आपले वजन देखील कमी होते.
मत्स्यासन
सध्याच्या कोरोना काळात मत्स्यासन करणे खूप फायदेशीर आहे. मत्स्यासन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. मत्स्यासन एक फिश पोझ आहे जी शरीराला डिटॉक्स करते. तसेच यामुळे ऊर्जा वाढवते. आपण कोरोना संसर्गातून बरे होत असल्यास आपण हे आसन करू शकता. मत्स्यासन करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जमिनावर झोपावे लागेल. त्यानंतर पायाची मांडी घाला आणि पायाचे दोन्ही पंजे हाताने पकडा. त्यानंतर पाठ वरती उचलण्यासाठी प्रयत्न करा. हे आसन साधारण वीस मिनिटे टिकवण्याचा प्रयत्न करा. आसन स्थिती स्थिर ठेवा. हे आसन आपल्या निरोगी आयुष्यासाठी खूप महत्वाचे आहे. हे आसन आपण दररोज केले पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायकhttps://t.co/y89Pxceis3#VitaminD #FoodSupplement
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 20, 2020
(Do yoga to control diabetes)