तुम्हीही पेपर कपमध्ये चहा पिता का? आरोग्यासाठी ठरते हानिकारक

| Updated on: Dec 23, 2023 | 8:07 PM

प्लॅस्टिकवर बंदी आल्यानंतर आता चहा देण्यासाठी अनेक जण पेपर कप वापरतात. पण पेपर कपमध्ये देखील कोणतीही गरम वस्तू पिणे आरोग्यासाठी धोक्याचे ठरु शकते. काय आहे कारण. आरोग्यासाठी कसे ठरु शकते हानिकारण जाणून घ्या.

तुम्हीही पेपर कपमध्ये चहा पिता का? आरोग्यासाठी ठरते हानिकारक
paper cup
Follow us on

Side Effects of Paper Cup : ऑफिसमध्ये किंवा बाहेर टपरीवर अनेक जण पेपर कपमध्ये चहा मागतात. पण असं करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. या कपांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक आता चहा पिऊ लागले आहेत. पण फार लोकांना या गोष्टीची कल्पना नाही की पेपर कपचा वापर आरोग्यावर हानिकारक परिणाम करतो. पेपर कपमध्ये चहा प्यायल्याने आरोग्याला काय हानी होते जाणून घेऊय

प्लॅस्टिक बंद झाल्यानंतर पेपर पासून बनवलेल्या गोष्टींचा वापर वाढला आहे. यामध्ये मग पेपर कपचा ही समावेश होतो. बाहेर चहा पिताना लोकं पेपर कपमध्ये चहा मागतात. पण ते आरोग्यासाठीही खूप घातक ठरू शकते. पेपर कप बनवताना कपला प्लास्टिक किंवा मेणाचा लेप केला जातो. त्यामुळेच जेव्हा पेपर कपमध्ये गरम वस्तू टाकतो तेव्हा त्यात असलेली रसायने त्यात मिसळू शकतात. ज्याचा आपल्या आरोग्यावर हानिकारण परिणाम होऊ शकतो.

पेपर कपमध्ये चहा पिण्याचे तोटे

  • पेपर कपमध्ये जर तुम्ही गरम वस्तूंचे सेवन करत असाल तर रसायने त्यामध्ये वितळून आपल्या पोटात जावू शकतात. ज्यामुळे अपचन किंवा जुलाब सारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • पेपर कपसाठी वापरले जाणारे केमिकल्स आपल्या शरीरात जावून टॉक्सिन्स जमा होऊ शकतात. जे शरीरात स्लो पॉयझनसारखे काम करू शकते.
  • पेपर कपमधून कोणतीही गरम गोष्टीचं सेवन केल्याने त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. किडनीवर ही परिणाम होऊ शकतो. ज्याचे पुढे गंभीर परिणाम होऊ शकतात.
  • पेपर कपमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. ज्याचा आपल्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.