मुंबई : कोरोना काळानंतर आता सर्व पूर्ववत होत आहे. असे असताना जर तुम्ही मुंबईत स्ट्रीट शॉपिंग करणार असाल तर हे काही पर्यय तुमच्यासाठी. या बाजारपेठांमध्ये तुम्ही खरेदीचा आनंद घेऊ शकता. पण या वेळेत ओमीक्रॉनचा वाढता धोका पाहता
मुंबईत खरेदी करायची असेल तर क्रॉफर्ड मार्केटला तुम्ही भेट देणं आवश्यक आहे. क्रॉफर्ड मार्केट हे शहरातील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. फळे, भाज्या, पिशव्या, मेकअप, घरातील सजावटीच्या वस्तूंपासून ते खेळण्यांपर्यंत अनेक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी मिळतील.
कुलाबा कॉजवे मुंबईच्या सर्वात लोकप्रिय बाजारपेठांपैकी एक आहे. या बाजारात बरीच वर्दळ दिसून येते. कृत्रिम दागिने, वैयक्तिक दागिने, प्रासंगिक पाश्चिमात्य पोशाख, पादत्राणे, पिशव्या ते प्राचीन वस्तूंपर्यंत, या ठिकाणी शॉपिंगला भरपूर वाव आहे. या ठिकाणी नेहमीच लोकांची गर्दी असते. इथं तुम्ही आनंदानं खरेदी करु शकता.
विविध प्रकारचे परवडणारे आणि ट्रेंडी कपडे, दागिने, शूज लिंकिंग रोडवरील बाजारात मिळतील. मुंबईत रस्त्यावरील खरेदीच्या अनुभवासाठी लिंकिंग रोड आपल्या यादीत असणं आवश्यक आहे. लिकिंग रोड वांद्रे येथे आहे. हे शहरातील खरेदीदारांसाठी मोठ मार्केट आहे. येथील बाजारात काही ब्रँडेड शोरूम आणि बुटीक देखील आहेत.
रस्त्यावरील खरेदीसाठी मुंबईतील आणखी एक ठिकाण म्हणजे हिल रोड हे आहे. येथील बाजारात खूप गर्दी असते. हिल रोडवर खरेदीसाठी जाणार असाल तर तुम्हाला भाव कमी करण्यासाठी बार्गेनिंग करण्याचं कौशल्य असणं आवश्यक आहे. याद्वारे तुम्ही येथे खूप कमी किंमतीत कपडे खरेदी करू शकाल.
जर तुम्ही विविध प्रकारचे कापड, साड्या, ड्रेस मटेरियल आणि भारतीय पोशाख शोधत असाल तर थेट या दादर बाजारात जा आणि तुम्हाला जे काही शोधत आहात ते तुम्हाला मिळेल. ही सर्वात मोठी आणि सर्वात जुनी घाऊक कपड्यांची बाजारपेठ आहे. लग्नाच्या खरेदीसाठी उत्तम ठिकाण. तुम्ही तुमच्या बजेटनुसार येथे खरेदी करू शकता.
संबंधित बातम्या :
Armaan Kohli | अभिनेता अरमान कोहलीला मोठा धक्का, ड्रग्ज प्रकरणात जामीन देण्यास न्यायालयाचा नकार!
Bigg Boss Marathi 3 | सोनाली पाटीलनंतर ‘बिग बॉस मराठी’तून आणखी एका स्पर्धकाचे एलिमिनेशन