ब्रश करताना मळमळ होते का ? तर असू शकते हे गंभीर आजार

| Updated on: Dec 20, 2023 | 8:51 PM

ब्रश करताना जर तुम्हाला मळमळ किंवा उलट्या होत असतील हे गंभीर आजाराचे लक्षण असू शकते. अनेकांना ही समस्या जाणवते. पण कोणताही निष्कर्ष काढण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घेतला पाहिजे. कारण वेगवेगळ्या कारणांमुळे मळमळ होण्याची शक्यता असते.

ब्रश करताना मळमळ होते का ? तर असू शकते हे गंभीर आजार
Follow us on

vomiting while brushing : अनेकांना ब्रश करताना मळमळ आणि उलट्या होतात. असे जर काही वेळा होत असेल तर त्याचे कारण एसिडिटी किंवा अपचन असू शकते. अन्न पचत नाही तेव्हा पोटात पित्त तयार होते. ज्यामुळे अॅसिड रिफ्लक्स होतो आणि व्यक्तीला वारंवार मळमळ होऊ लागते. काहींना उलट्याही होतात. पण याशिवाय या समस्येमागे आणखी काही गंभीर कारणे असू शकतात. काय आहेत ते जाणून घ्या.

गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग

दात घासताना मळमळ होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पोटात अल्सर आणि गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग असू शकते. यामुळे पचन्याशी संबंधित समस्या होऊ शकते. पोटात वाढलेल्या ऍसिडमुळे मळमळ होऊ शकते आणि दात घासताना मळमळ वाढू शकते.

मूत्रपिंड निकामी होण्याची लक्षणे

ब्रश करताना उलट्या होणे किडनी निकामी होण्याचे लक्षण असू शकते. कारण मूत्रपिंडाच्या कार्यावर परिणाम होतो तेव्हा पोटाशी संबंधित समस्या उद्भवतात. जेव्हा शरीरात क्रिएटिनिनची पातळी वाढते तेव्हा मळमळ संबंधित समस्या उद्भवू लागतात आणि पोटाशी संबंधित समस्या वाढतात. अशा परिस्थितीत लोकांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास वारंवार होऊ लागतो.

हे सुद्धा वाचा

डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे

तुम्हाला जर मळमळ होण्याची समस्या जाणवत असेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. यामुळे भविष्यातील आजार टाळता येतील. अनेक गंभीर आजारांपासूनही तुमचे रक्षण होईल.