हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात चहा प्यायला अनेकांना आवडते. थंडीच चहा पिण्याची मजा वेगळीच असते. चहाला कोणीही नाही म्हणत नाही. हिवाळा सुरु झाला की अनेक आजार देखील वर डोकं काढतात. त्यामुळे हिवाळ्यात काही सुपरफूड्स आपलं संरक्षण करु शकतात. हिवाळ्यातील सुपरफूडपैकी एक म्हणजे “गूळ”. गुळाचा चहा प्यायल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात.
गुळात लोह, झिंक, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस ही महत्त्वाची खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात. ज्यामुळे शरीराला उबदार ठेवण्यास मदत तर होतेच पण रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. शरीराला संसर्गापासून वाचवण्यासाठी गुळाचा चहा महत्त्वाची भूमिका बजावते.
गूळ शरीरात उष्णता निर्माण करण्याचं काम करतो. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. प्रतिकारशक्ती मजबूत झाली तर सर्दी आणि खोकला ज्यामुळे होते त्या जंतूंचा प्रभाव कमी होतो. गुळाचा चहा सामान्य सर्दी आणि फ्लूशी लढण्यास मदत करते.
गुळात अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. अँटिऑक्सिडंट्स रक्त शुद्ध करण्याचे काम करते. याच्या नियमित सेवनाने हिमोग्लोबिनची पातळी वाढते. जेव्हा शरीरातील विषारी पदार्थ शरीरातून पूर्णपणे काढून टाकले जातात तेव्हा ते शरीर निरोगी राहण्यास मदत करते.
गुळातील पोषक घटक इलेक्ट्रोलाइट्स संतुलित करण्यास मदत करतात. हे चयापचय वाढवते, जे वजन कमी करण्यास मदत करते. चहामध्ये गोडवा आणण्यासाठी रिफाइंड साखरेऐवजी गुळाचे सेवन करणे अनेक प्रकारे अधिक प्रभावी ठरू शकते आणि ते आरोग्यास देखील प्रोत्साहन देते.
गूळ एक जटिल कार्बोहायड्रेट आहे. याचा अर्थ ते हळूहळू तुटते आणि लगेच रक्तप्रवाहात शोषले जात नाही. अशा परिस्थितीत ते शरीरात हळूहळू ऊर्जा सोडते आणि शरीराला दीर्घकाळ ऊर्जावान राहण्यास मदत करते.
कधी कधी गुळाचा चहा बनवताना दुध फाटते. असे घडते कारण गुळावर प्रक्रिया करण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. त्यामुळेच दुधात टाकताच चहा फाटतो.
हे टाळण्यासाठी सेंद्रिय किंवा चांगल्या प्रतीचा गूळ वापरावा. किंवा तुम्ही गुळात मसाले आणि चहाची पाने देखील मिक्स करू शकता. ते काही मिनिटे उकळवा आणि नंतर दूध घाला. त्यामुळे चहा फाटणार नाही.