Brigham University report : आपल्याकडे एक म्हण आहे, जो रात्री लवकर झोपून, सकाळी लवकर उठतो, त्याला चांगले आरोग्य लाभते. सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत. जे मुलं किंवा मोठी माणसं ही सकाळी लवकर झोपेतून उठत नाहीत, त्याना भविष्यात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अमेरिकेमधील ब्रिगहॅम विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार ज्या मुलांना सकाळी झोपेतून उशीरा उठण्याची सवय आहे, त्यांच्यामध्ये आळस, स्थूलता, शुगर या सारखे आजार अधिकप्रमाणात आढळून येतात. त्यांच्यामध्ये थकव्याचे प्रमाण देखील अधिक असते. या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या दौनंदिन कामात देखील अनेक अडचणी येतात.
झोपेच्या सवयींचा लहान मुलांवर काय परिणाम होतो, हे तपासण्यासाठी अमेरिकेमधील ब्रिगहॅम विद्यापीठातील काही तज्ज्ञांनी संशोधन केले, त्यासाठी त्यांनी पहिल्या आठवड्यात 6.5 तास झोपणाऱ्या मुलांचा अभ्यास केला, तर त्यापुढील आठवड्यात सरासरी 6.5 तास झोपणाऱ्या मुलांचा अभ्यास केला. या प्रयोगामध्ये दोनही प्रकारामधील मुलांना सारखेच जेवण देण्यात आले होते. आहारामध्ये फळ आणि भाजीपाला यासारख्या गोष्टींचा समावेश होता.
प्रयोगांती तज्ज्ञांना असे आढळून आले की, जे मुले 6.5 तास झोपतात त्यांचे आरोग्य हे 9.5 तास झोपणाऱ्या मुलांच्या तुलनेत अधिक चांगले आहे. त्यांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण देखील नियंत्रित असून, ते अधिक चप्पळ आहेत. मात्र जे मुले उशिरा उठतात, त्यातील अनेक मुलांना मधुमेहाचा त्रास आहे. तसेच त्यांच्यामध्ये स्थुलता देखील अधिक आढळून आली. या प्रयोगामध्ये संबंधित मुलांच्या काम करण्याच्या पद्धतीचा देखील अभ्यास करण्यात आला होता.
डोळ्यांच्या समस्याने त्रस्त आहात?, तर आजच ‘या’ पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा
Eye care tips : बदाम आणि तुपापासून बनवा घरीच काजळ; जाणून घ्या फायदे