‘या’ उन्हाळ्यात प्या थंड दूध… त्वचेच्या समस्येबरोबर पोटातील जळजळही थांबेल.. !

| Updated on: May 06, 2022 | 10:51 AM

कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, रिबोफ्लेविन आणि अनेक प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेले दूध प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. पण उन्हाळ्यात थंड दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे, त्वचेच्या समस्या तर दुर होतातच परंतु, पोटातील दाह कमी होण्यासही मदत होते.

‘या’ उन्हाळ्यात प्या थंड दूध... त्वचेच्या समस्येबरोबर पोटातील जळजळही थांबेल.. !
उन्हाळ्यात थंड दूध प्या...
Image Credit source: (Image Google)
Follow us on

दूध हे बहुधा भारतीय घरांमध्ये सर्वाधिक वापरले जाते. लहान मुलाच्या आहाराचा मुख्य घटक (main component of the diet) एक ग्लास दूध असतो. प्रौढांसाठीही ते तितकेच महत्त्वाचे आहे. प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम, जस्त, व्हिटॅमिन डी आणि पोटॅशियमने समृद्ध असलेले दूध हे पोषक तत्वांचे भांडार असल्याचे मानले जाते. पण उन्हाळा आहे, अशा परिस्थितीत प्रत्येक गोष्ट खाण्याआधी दोनदा विचार करायला हवा, कारण कधी कोणत्या पदार्थाने शरीराला नुकसान होईल हेच कळत नाही. अनेकांना सकाळी नाश्त्यात गरम दूध पिण्याची सवय (habit of drinking hot milk) असते. परंतु, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्हाला ही सवय महागात पडू शकते. उन्हाळ्यात गरम दुध शरीराला हाणी पोहचू शकते. त्याएवजी तुम्ही आजपासून थंड दूध पिण्यास सुरूवात करा. या थंड दुधाचे अनेक फायदे असून, थंड दुध तुमच्या त्वचेची काळजी (Skin care) तर, घेतेच यासोबतच पोटातील दाह कमी करण्यासही मदत होते.
शरीर थंड राहते
दूध हे संपूर्ण पोषक तत्वाने भरलेले आहे, जे शरीराच्या गरजेनुसार कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, पोटॅशियमची गरज पूर्ण करते. निरोगी राहण्यासाठी दुधाचे अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात थंड दूध पिणे जास्त फायदेशीर आहे. याचे सेवन केल्याने शरीरातील उष्णता संपून शरीर आतून थंड होते. दूध निसर्गात थंडगार आहे, त्यामुळे ते प्यायल्याने शरीर थंड राहते.

पोटाची जळजळ थांबविण्यास मदत

उन्हाळ्यात तुम्हाला अनेकदा पोटात जळजळ, आम्लपित्त आणि अल्सरचा त्रास होत असेल तर थंड दूध हा उत्तम उपाय आहे. जर तुम्हाला पचनाच्या समस्यांमुळे त्रास होत असेल, तर तुम्ही एक ग्लास थंड दुधात एक चमचा इसबगोल टाकू शकता, कारण ते बद्धकोष्ठता आणि ऍसिडिटी पासूनही आराम देते.

वजन कमी करण्यात फायदेशीर

थंड दूध खरोखर वजन कमी करण्यास मदत करते. थंड दुधात कॅल्शियम असल्यामुळे तुमच्या शरीरातील चयापचय क्रिया सुधारते. अशा प्रकारे जास्त कॅलरीज बर्न होतात. एक ग्लास दूध प्यायल्याने तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते आणि अनावश्यक स्नॅकिंग टाळण्यास देखील मदत होते.

निरोगी त्वचेसाठी

थंड दूध इलेक्ट्रोलाइट्सने भरलेले असते जे तुमच्या शरीराला निर्जलीकरणाशी लढण्यास मदत करू शकते. हे तुमचे शरीर हायड्रेट ठेवेल आणि त्वचा चमकदार ठेवेल. थंड दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी. आणि तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर कच्चे थंड दूध देखील लावू शकता.
थंड आणि गरम दूध कोणत्याही प्रकारे पिणे फायदेशीर आहे. पण जर तुम्ही ऋतूनुसार दूध प्यायले तर ते तुमच्या आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते.