मुंबई : सकाळी झोपेतून उठलं की सर्वात आधी कुठल्या गोष्टीची गरज वाटत असेल तर तो म्हणजे चहा. त्यातच भारतातील चहाची चव ही जगभरात प्रसिद्ध आहे. काही लोकांना चहाऐवजी कॉफी पिणे देखील आवडते. आत्तापर्यंत तुम्ही ऐकले असेलच की चहा पिण्यामुळे आरोग्यास हानी पोचते. पण आम्ही तुम्हाला अशा काही खास चहाविषयी सांगत आहोत जे प्यायल्याने तुम्ही निरोगी व्हाल. तसेच या चहामुळे तुमचे वजन देखील कमी होण्यास मदत होते. (Drink herbal tea to stay healthy and fit)
ग्रीन टी – चयापचय सुधारते
संशोधनानुसार, ग्रीन टीमध्ये आढळणारे केमिकल ईजीसीजी आहे, जे शरीरातील चयापचय वाढविण्याचे काम करते. ज्यामुळे आपले वजन कमी होते. हे एका दिवसात 70 कॅलरी बर्न करू शकते. ग्रीन टी अँटीऑक्सिडेंटची पातळी वाढवण्याचे काम करते. त्यात उपस्थित कॅटेचिन अँटीऑक्सिडेंट्स शरीराच्या चयापचय दर वाढविण्यात मदत करते.
गुलाब चहा – बद्धकोष्ठता दूर करते
गुलाब चहा सर्व चहापैकी सर्वात जुना आहे. हा चहा गुलाब आणि चहा पावडर एकत्र करुन बनविला जातो. जो आपल्या शरीरासाठी औषधी म्हणून काम करतो. याशिवाय शरीराचे विष द्रव काढून टाकते आणि त्वचा सुंदर बनविण्यात मदत करते. गुलाब चहामध्ये अ, बी 3, सी, डी, ई जीवनसत्त्वे असतात. जे संक्रमणास लढण्यास मदत करतात. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर होते. हा चहा वजन कमी करण्यास देखील मदत करतो.
लेमन टी – रोगप्रतिकारक शक्ती
‘लेमन टी’ पिणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. ‘लेमन टी’चे नियमित सेवन फायदेशीर ठरू शकते. जर रोगप्रतिकारक शक्ती चांगली नसेल, तर हवामान बदलल्यामुळे लोकांना त्रास होऊ लागतो. अशा लोकांना ताप, सर्दी, खोकला येणे, घसा खवखवणे, छातीत श्लेष्मा, कफ यासारखे त्रास उद्भवू लागतात. यावर आले आणि लिंबू घातलेला चहा गुणकारी ठरतो. आले-लिंबूयुक्त चहा या समस्यांपासून आपले संरक्षण करतो आणि आपली रोगप्रतिकार शक्ती सुधारतो.
गवती चहा – रोगांपासून दूर ठेवतो
गवती चहा पिण्याऱ्यांची संख्या अधिक आहे. कारण गवती चहामुळे पोषक तत्व, विटॅमिन, अँटीऑक्सिडेंट मिळतात. हा चहा पुर्णपणे आयुर्वेदिक चहा आहे. गवती चहाच्या सेवनामुळे पोटदुखी सारखे विकार देखील दूर होतात. जर तुमचे खूप डोके दुखत असेल तर गवती चहा घ्यावा यामुळे तुमची डोकेदुखी दूर होईल. गवती चहाच नाहीतर त्याचा काढा देखील खूप प्रभावी आहे. ताप सर्दी आणि खोकला येत असेल तर दिवसातून साधारण तीन ते चार वेळा गवती चहा पिलातर तुम्हाला बरे वाढेल.
संबंधित बातम्या :
दुधाच्या चहापेक्षा ‘ग्रीन टी’ला मिळतेय सर्वाधिक पसंती! वाचा या ‘ग्रीन टी’चा रंजक इतिहास…#GreenTea | #Health | #food | #drink https://t.co/VMbYebOZ9t
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Drink herbal tea to stay healthy and fit)