मुंबई : कोरोनामुळे आपले सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. भारतामध्ये तर कोरोना रूग्णांची संख्या वाढतच आहे. अशा परिस्थितीमुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक झाले आहे. कोरोनापासून दूर राहिचे असेल तर एकच पर्याय आहे. तो म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे. कारण आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेलतर आपण कोरोनाला दूर ठेऊ शकतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला आपल्या आहारात थोडा बदल करावा लागणार आहे. (Drink lemon, watermelon and aloe vera juice to boost immunity during corona)
लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे, जे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते, परंतु आपणास माहित आहे का की, लिंबू पाणी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात घामामुळे शरीराचे अनेक घटक बाहेर पडतात. आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील शरीराबाहेर पडतात. दररोज एका ग्लास लिंबू पाणी प्यायल्याने या घटकांची मात्रा शरीरात टिकून राहते. व्हिटामिन सी समृद्ध लिंबू पाणी त्वचा सुधारते. आठवड्यातून एकदा याचे सेवन केल्याने त्वचेच्या समस्या देखील दूर होतात.
कोरफड आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असते. तसेच कोरफड रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम देखील करते. सकाळी एक ग्लास कोरफडचा रस पिण्यामुळे शरीरास संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण मिळू शकते. कोरफडीत असलेल्या गुणांमुळे केस दाट आणि सुंदर होण्यास मदत होते. ही वनस्पती केसांच्या मुळातील पीएच घटकाचे संतुलन कायम राखण्यास मदत करते. कोरफडाने केस गळणे थांबते, केसांची वाढ चांगली होते, केसांतील कोंडा जातो, स्कॅल्पच्या समस्या दूर होतात आणि केसांचे चांगले पोषणही होते.
कलिंगडचा रस पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. विशेष म्हणजे दररोज कलिंगडचा रस पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगडचा रस हा एक उत्तम पर्याय मानला जातो. कलिंगडचा रस पोट थंड ठेवते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत नाही.
संबंधित बातम्या :
Hair Mask | केस गळती, रुक्षपणा समस्या होणार दूर, ‘हा’ हेअर मास्क ठरेल केसांसाठी वरदान!https://t.co/eedFAgnEcM#HairCare #HairMask
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020
(Drink lemon, watermelon and aloe vera juice to boost immunity during corona)