रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या दूध आणि मध !

| Updated on: Apr 29, 2021 | 10:38 AM

कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवणे आता खूप महत्वाचे झाले आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज सकाळी प्या दूध आणि मध !
दूध आणि मध
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमध्ये आपण आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकवणे आता खूप महत्वाचे झाले आहे. यासाठी आपल्याला आहारासोबतच इतर अनेक गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला जीवनशैलीत थोडासा बदल करावा लागणार आहे. आपल्या सर्वांनाच सवय असते ती, म्हणजे सकाळी उठल्याबरोबर चहा घेण्याची मात्र, ही सवय आपल्याला बदलावी लागणार आहे. (Drink milk and honey every morning to boost the immune system)

रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल आणि कोरोनापासून दूर जर आपल्याला राहिचे असेल तर त्यासाठी सकाळी चहा न घेता. सकाळी उपाशी पोटी आपल्याला दूध आणि मध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहिली आणि आपण अनेक आजारांपासून दूर राहाल. सर्वात अगोदर दूध गरम करून घ्यावे त्यानंतर दूध कोमट झाल्यावर त्यामध्ये मध मिक्स करा आणि प्या. बऱ्याच लोकांना दूध आणि मधामध्ये साखर मिक्स करून पिण्याची सवय असते. मात्र, असे चुकूनही करू नका.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फक्त दूध आणि मधच मिक्स करा. जर आपल्याला शक्य असेल तर हे पेय आपण रात्री देखील घेऊ शकतो.मध खनिजे, जीवनसत्त्वे आणि इतर पोषक तत्वांचा संग्रह आहे. रोगप्रतिकार शक्ती बळकट करण्याव्यतिरिक्त, मध अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यात देखील प्रभावी आहे. आयुर्वेदात याचा उपयोग सर्व रोग बरे करण्यासाठी केला जातो. खोकल्याचा त्रास बराच काळ बरा होत नसेल, तर मधाचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते. मधात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे गुणधर्म असतात, जे संसर्ग रोखतात.

मध कफ सहजपणे काढून टाकतो. आपण एखादा चमचा नुसता मधही खाऊ शकता. याशिवाय आल्याच्या रसामध्ये मध मिसळून खाल्याने कफ आणि खोकल्यात खूप आराम मिळतो. दूध हे बर्‍याच पोषक तत्वांचे भांडार आहे आणि भारतात दूध हा रोजच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. दुधात आढळणारे कार्ब, प्रथिने आणि चरबी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत, म्हणून प्रत्येकाचाच दूध पिण्यावर भर असतो.

संबंधित बातम्या :

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

(Drink milk and honey every morning to boost the immune system)