मुंबई : निरोगी आहार (Health)आणि पुरेसे पाणी (Water) पिणे केवळ तंदुरुस्त राहण्यासच मदत करत नाही तर तुमची त्वचा चमकदार बनवते. अनेक लोक चमकदार त्वचेसाठी विविध रसायनयुक्त सौंदर्य उत्पादने वापरतात. परंतु ते दीर्घकाळापर्यंत त्वचेचे नुकसान करते. अशा परिस्थितीत तुम्ही नैसर्गिक (Nature) घटकांचा वापर करून अनेक प्रकारचे फेस पॅक देखील बनवू शकता. ग्लोइंग स्कीनसाठी घरगुती डिटॉक्स ड्रिंक देखील घेऊ शकता. हे डिटॉक्स ड्रिंक नेहमे कोणते याबद्दल जाणून घेऊयात.होममेड डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी तुम्हाला पुदिना, आले, काकडी आणि सब्जा इत्यादींची आवश्यकता असेल.
प्रथम आले कापून किसून घ्या. काकडी सोलून कापून घ्या. पुदिन्याची ताजी पाने आणि भिजवलेल्या सब्जा घ्या. पुदिन्याची पाने, आले आणि काकडी ब्लेंडरमध्ये टाका. आता या पेयात भिजवलेला सब्जा टाका. हे खूप चवदार आहे. तुम्ही ते सहज बनवू शकता. याचे नियमित सेवन केल्याने तुमची त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
इतर बातम्या
Pune metro | पुणेकरांनो मट्रोचे तिकीट करा ‘ऑनलाईन बुक’ ; मट्रो प्रशासनाकडून ॲपची निर्मिती
ICC WWC 2022: एकटी हरमनप्रीत लढली, न्यूझीलंडचा भारतावर मोठा विजय