मुंबई : कोरोना काळात घरात सुरक्षित राहून आपल्या आरोग्याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागणार आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी सर्वात महत्वाचे झाले की, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर आपल्याला कोरोनाची लागण देखील होणार नाही. मात्र, यादरम्यान आपल्या आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी टोमॅटो आणि पालक रस पिणे फायदेशीर आहे. (Drink tomato and spinach juice daily during the corona period)
टोमॅटो रस घरच्या घरी कसा तयार करायचा हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा रस पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. यासाठी एक ग्लास पाणी, मीठ आणि दोन टोमॅटो लागणार आहेत. सर्वात अगोदर पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवा आणि त्यात मीठ मिसळा. त्यानंतर टोमॅटोची पेस्ट बारीक करून घ्या आणि या गरम पाण्यात मिसळा. हे मिश्रण साधारण वीस ते तीस मिनिटे मंद गॅसवर ठेवा आणि गरमा गरम प्या. हा टोमॅटोचा रस आपण दररोज आहारात घेतला तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास नक्की मदत होईल.
टोमॅटो खाण्याने आपल्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. कारण टोमॅटोमध्ये जवळापास 94 टक्के पाणी असते. यामुळे विशेष: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये टोमॅटो जास्तीत-जास्त खाल्ले पाहिजे. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो. अशा व्यक्तींनी तर दररोज सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी एक टोमॅटो तरी खाल्ले पाहिजे. यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. पालकचा रस घरी तयार करण्यासाठी पालकाची सात ते आठ पान घ्या. मिक्सरमध्ये पालकाची बारीक पेस्ट तयार करून घ्या. आणि त्यामध्ये मीठ मिक्स करा.
हा रस आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी पिऊ शकतो. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल. पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पालकाचं सेवन केल्यामुळे शरीरातील फ्री रेडिकल्सला बाहेर काढण्यास मदत होते. या फ्री रेडिकल्समुळे कॅन्सरसारखे रोग होतात. पालकमध्ये ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Drink tomato and spinach juice daily during the corona period)