मुंबई : नारळ पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. नारळ पाणीमध्ये इलेक्ट्रोलाईट, पोटॅशियम, लोह, मॅंगनीज, व्हिटॅमिन सी आणि फोलेट यासारखे आणखी बरेच पौष्टिक घटक त्यात आढळतात. जरी नारळाच्या पाण्याची चव गोड असली, तरी त्यात नैसर्गिक साखर असते आणि कृत्रिम स्वीटनर अजिबात वापरला जात नाही. त्यामुळे आपल्या शरीराच्या किंवा रक्ताच्या साखर पातळीवर त्याचा काहीही परिणाम होत नाही. (Drinking coconut water is beneficial for health)
नारळ पाणीमध्ये 94 टक्के पाणी असते. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी आहे. 250 मिली नारळाच्या पाण्यात पौष्टिक सामग्री खालीलप्रमाणे-
-कार्ब – 9 ग्रॅम
-फायबर – 3 ग्रॅम
-प्रथिने – 2 ग्रॅम
-आरडीआय व्हिटॅमिन सी – 10 टक्के
-आरडीआय मॅग्नेशियम – 15 टक्के
-आरडीआय मॅंगनीज -17 टक्के
-आरडीआय सोडियम – 11 टक्के
-आरडीआय कॅल्शियम – 6 टक्के
हायड्रेट
उन्हाळ्यात नारळ पाण्याचे सेवन करणे चांगले असते. हे शरीरातील ग्लूकोजची पातळी चांगली ठेवते. हे पिण्यामुळे तुमचे शरीर हायड्रेटेड राहते.
पोटाची समस्या
पोट्यातील जळजळ, अल्सर, कोलायटिस, आतड्यांमधील जळजळ यासारख्या पोटाच्या समस्यांमध्येही नारळपाण्यामुळे आराम मिळतो. हे आपल्या शरीरास ऊर्जा देते. अशक्तपणा, थकवा, चक्कर येणे यासारख्या समस्यांतून आराम मिळतो.
रक्तदाब
नारळाच्या पाण्यात व्हिटॅमिन-सी, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम यासारखे पोषक असतात. यामुळे तुमचे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
मुरुमांची समस्या
नारळाचे पाणी चेहऱ्यावरील मुरुम काढून टाकण्यास देखील मदत करते. आपण फेसपॅक म्हणून देखील याचा वापर करू शकता.
टॅनिंगसाठी फायदेशीर आहे
उन्हाळ्यात, टॅनिंग काढून टाकण्यासाठी आपण नारळाच्या पाण्याने आपला चेहरा धुवू शकता. यामुळे टॅनिंग कमी होते आणि चेहरा थंड होतो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर
नारळ पाणी पिण्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे संसर्गजन्य रोगांचा धोका कमी होतो.
नारळाचे पाणी पिण्याची योग्य वेळ
दिवसाच्या कोणत्याही वेळी आपण नारळाचे पाणी पिऊ शकता. परंतु सकाळ अधिक चांगली मानली जाते. यावेळी आपले शरीर आपले सर्व पोषक द्रव्य शोषून घेते.
संबंधित बातम्या :
Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!
Skin Care | सकस अन्न खा, भरपूर पाणी प्या, हिवाळ्यात त्वचेचे सौंदर्य जपा!
Health | मनुष्य जीवनाशी निगडीत ‘या’ गोष्टी जाणून घ्या आणि तणावमुक्त, सकारात्मक आयुष्य जगा!https://t.co/eNdbD2CG42#healthcaretips
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
(Drinking coconut water is beneficial for health)