मुंबई : हिवाळा असो किंवा उन्हाळा, शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. आपण दररोज सुमारे 2.5 लीटर ते 3 लिटर पाणी प्यायले पाहिजे. कोमट पाणी पिण्यामुळे तुमची पचन क्रिया देखील मजबूत राहते. बद्धकोष्ठतासारख्या समस्यांपासूनही मुक्ती मिळते. तसेच, डिहायड्रेशन देखील टाळता. (Drinking hot water is beneficial for health)
कोमट पाणी पिण्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्तीही बळकट होते. आपण थंड पाणी किंवा गरम पाणी पीत असतो. परंतु, जर आपण नियमित गरम पाण्याचे सेवन केले, तर आपल्याला त्यातून बरेच फायदे मिळतील. गरम पाणी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी गरम पाणी अतिशय लाभदायक आहे. अनेकदा डॉक्टारांकडून एक व्यक्तीला कमीत-कमी आठ ग्लास पाणी पिणं आवश्यक असल्याचं सांगितलं जातं.
अनेकदा आपल्याकडून इतकं पाणी प्यायलं जात नाही. त्यामुळे संपूर्ण वेळ कोमट पाणी पित नसल्यास, दिवसाच्या सुरुवातीला एक ग्लास गरम पाणी आणि रात्री झोपताना एक ग्लास गरम पाणी पिण्याने काही प्रमाणात हायड्रेटेड राहण्यास मदत होते. गरम पाणी पचनतंत्र सक्रिय ठेवण्यास मदत करतं. गरम पाणी पोट आणि आतड्यांमधून जातं, त्यावेळी पचनतंत्र हायड्रेटेड होतात आणि जमा झालेला कचरा बाहेर काढण्यास मदत होते. जेवणानंतर काही वेळाने गरम पाणी पिण्याची सवय लावल्यासही फायदा होतो.
यामुळे जेवण लवकर पचतं आणि पोट हलकं राहण्यासही मदत होते. नकळतपणे काही चुकीचं खाल्यास त्याला बाहेर काढण्यासाठी गरम पाणी पचनतंत्राची मदत करु शकतं. आपण आपल्या वाढत्या वजनाने त्रस्त असाल, तर आपण दररोज गरम पाण्याचे सेवन करू शकता. गरम पाण्याचे सेवन केल्याने तुमचे चयापचय बळकट होते, जे तुमचे वजन कमी करण्यास मदत करते. कोमट पाण्यात लिंबू मिसळून, ते पाणी प्यायल्याने आपले वजन देखील कमी होऊ शकते.
अनेकदा महिलांना पीरियड्स दरम्यान खूप त्रास होतो. काहींना असह्य वेदना देखील होत असतात. म्हणून जर आपणही या समस्येशी संघर्ष करत असाल, तर त्यापासून मुक्त होण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे आपल्या पाळीच्या दरम्यान गरम पाण्याचे सेवन करणे. यामुळे आपल्याला वेदनांमध्ये बरेच आराम मिळेल.
संबंधित बातम्या :
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Drinking hot water is beneficial for health)