Lemon Water | स्वादच नाही तर, ‘या’ फायद्यांसाठी लिंबू पाणी पिणे आवश्यक !

| Updated on: Mar 23, 2021 | 10:26 AM

लिंबू पाणी पिणे अनेक लोकांना आवडते तर काही लोकांची सुरूवातच लिंबू पाणी पिण्याने होते.

Lemon Water | स्वादच नाही तर, ‘या’ फायद्यांसाठी लिंबू पाणी पिणे आवश्यक !
लिंबू पाणी
Follow us on

मुंबई : लिंबू पाणी पिणे अनेक लोकांना आवडते तर काही लोकांची सुरूवातच लिंबू पाणी पिण्याने होते. लिंबू पाणी हे असेच एक पेय आहे, जे उन्हाळ्यात तोंडाची चव वाढवण्यासाठी वापरले जाते, परंतु आपणास माहित आहे का की चवी व्यतिरिक्त, लिंबू पाणी शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला, जाणून घ्या याचे फायदे (Drinking lemon water is beneficial for health)

-लिंबूयुक्त पाणी प्यायल्याने शरीराची प्रतिकारशक्ती सुधारते, परंतु यात साखरेऐवजी गुळ वापरण्याची खबरदारी घेतली पाहिजे. अधिक साखर घालून सेवन केल्याने पोटात आम्लता निर्माण होते.

-सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी दररोज लिंबू पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतील लिंबू पाणी पिल्याने चेहरा उजळतो आणि चेहरा चमकदार होतो. त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

-याच्या सेवनामुळे नैराश्य आणि तणाव कमी होतो. बर्‍याच संशोधनात असे निष्कर्ष समोर आले आहेत की, शरीर हायड्रेटेड राहिल्यास तणावापासून दूर राहण्यात मदत होते. त्याचबरोबर, शिकंजीमध्ये लिंबाचा वापर केला जातो, जो तुम्हाला ताजेतवाने ठेवण्यात प्रभावी आहे.

-एक चमचा मधात लिंबाचा रस मिसळा आणि मास्क सारख्ये चेहऱ्यावर लावा. लिंबाचा रस मुरुमाचे डाग दूर करण्यास मदत करते. जर तुम्ही डोक्यातील कोड्यामुळे त्रस्त असाल तर लिंबाचा रस, मध आणि नारळ तेलाने केसांची मालिश करा. आपण मालिश केल्यानंतर साधारण 30 मिनिटांनंतर पाण्याने केस धुवा.

‘हे’ ही लक्षात ठेवा!
लिंबाच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने छातीत जळजळ होण्यास त्रास होऊ शकतो आणि एखाद्या व्यक्तीस आधीपासूनच हा आजार असेल, तर त्यांनी लिंबाच्या पाण्यापासून दूर रहावे. हार्टबर्नला ‘अ‍ॅसिड रिफ्लक्स’ असेही म्हणतात, ज्यात पोटात तयार होणारे अ‍ॅसिड अन्न पचवण्यासाठी अन्ननलिकेकडे परत येते, ज्यामुळे छातीत दुखणे आणि जळजळ जाणवते. असे झाल्यास लिंबासह सर्व आम्ल पदार्थांचे कमीतकमी सेवन केले पाहिजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Gulkand Benefit | वजन कमी करण्यापासून ते अनेक समस्यांवर गुणकारी ‘गुलकंद’, जाणून घ्या याचे फायदे..

Constipation Problem | बद्धकोष्ठतेच्या समस्येला तुमच्यापासून दूर ठेवतील ‘हे’ रस, नियमित करा सेवन!

 

(Drinking lemon water is beneficial for health)