मुंबई : हळदीचे दूध (Turmeric Milk) हे नेहमीच आपल्या भारतीय परंपरेचा एक भाग बनले आहे. भारतीयांच्या स्वयंपाकघरात मसाल्यांची कमतरता नाही आणि त्यामध्ये हळदीला विशेष महत्त्व आहे. हळदीशिवाय कोणतेही भारतीय स्वयंपाकघर अपूर्ण आहे. हळद जवळजवळ प्रत्येक घरात वापरली जाते. सर्दी-खोकला किंवा इतर वेळीही बरे वाटत नसल्यास उपाय म्हणून आपल्या घरात हळदीच्या दुधाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. हळदीच्या दूधाचे सेवन आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. (Drinking turmeric milk is beneficial for health)
-हळदीचे दूध रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. अनेक अभ्यासानुसार असे सांगितले आहे की, मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखर कमी करण्यास हळदीचे दूध मदत करते.
-रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. तसेच आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते.
-हळदीच्या दुधामुळे पचन करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील आंबटपणा कमी होतो. हळद मिसळून जास्त प्रमाणात दूध पिल्यास त्रास होऊ शकतो. म्हणून, एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे.
-हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे.
-झोपण्यापूर्वी तासभर आधी ग्लासभर गरम दूध प्यायल्यास शांत झोप मिळण्यास मदत होते.
-हळदीच्या दुधात एक चिमूटभर मिरपूड ठेवल्यास घसा खवखवणे आणि संसर्ग कमी होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Drinking turmeric milk is beneficial for health)