मुंबई : आपल्या सर्वांना सकाळी उठल्या-उठल्या चहा लागतो. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात काही दिवस चहाला गुडबाय बोला आणि सकाळी अगोदर हळदीचे दूध प्या हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. तुम्हाला हे माहिती आहे का? की, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध खूप महत्वाचे आहे. कारण हळद आणि दूध पिणे आपल्या हाडांसाठी फायदेशीर असते आणि यामुळे आपले हाडे मजबुत होतात. त्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. (Drinking turmeric milk is very beneficial for health)
-हळदीचे दूध कर्करोगाच्या रुग्णांसाठी देखील खूप चांगले मानले जाते. हळदीमध्ये आढळणारा करक्युमीन हा घटक कर्करोगाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. तसे, तो कर्करोगाच्या रुग्णांना बरे होण्यासही मदत करतो. हळद असलेले दूध पिण्यामुळे तुमची झोपेची समस्या देखील दूर होते.
-हळदीचे दूध तयार करण्यासाठी अत्यंत सोप्पे आहे. पण योग्य पध्दतीने केले तर तुम्हाला पोषण घटक जास्त मिळतात. यासाठी अगोदर दूध गरम करून घ्या त्यानंतर एका ग्लासमध्ये दूध घ्या आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद घाला आणि थंड होण्याच्या आत प्या. हळदीचे दुध पिणे फायदेशीर आहे.
-रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळद अतिशय गुणकारी आहे. हळदीमध्ये अँटीव्हायरल, अँटीफंगल गुण असतात. ज्यामुळे सर्दी, ताप, खोकला यासारख्या विकारावर हळद गुणकारी ठरते. तसेच आजार लवकर बरा होण्यासही मदत मिळते.
-हृदय निरोगी ठेवण्यासाठीही हळद अतिशय प्रभावी ठरते. हळदीमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे आपले हृदय निरोगी राहण्यास मदत होते. हळदीचे दूध आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करते. ज्यामुळे आपले आरोग्य देखील निरोगी राहते.
-एक चिमूटभर हळद दुधात मिसळणे आपल्यासाठी फायदेशीर आहे. हळदीच्या दुधाचे आणखी फायदे करून घ्यायचे असतील, तर हळदीच्या पावडर ऐवजी कच्ची हळद दुधामध्ये घालून ते दुध प्यावे. हळदीयुक्त दुधाच्या सेवनाने चांगली झोप लागते. दुधात अमीनो अॅसिड असतात, जे चांगली झोप देण्यास प्रभावी ठरतात.
(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Milk Benefits | दररोज एक ग्लास गरम दूध सेवन करा, ‘या’ आजारांना दूर पळावा!
(Drinking turmeric milk is very beneficial for health)