पाणी भरपूर प्यायला पाहिजे म्हणजे आपण निरोगी राहतो. पण अहो नुसतं पाणी भरपूर पिऊन उपयोग नाही ते योग्य वेळी पिणं पण महत्त्वाचं आहे. आपलं शरीर हे 70 टक्के पाण्याने बनलेलं आहे हे तुम्हाला माहिती आहे. अशात पाणी ही निरोगी राहण्याचा उत्तम मार्ग आहे. पण तुम्ही कधी किती पाणी पिता यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे.
प्रत्येकाने नेमकं किती पाणी प्यायचं
आरोग्य तज्ज्ञांच्या मते प्रत्येकांने रोज 3-4 लिटर पाणी प्यायला हवं. मात्र प्रत्येकांच्या शरीरावर हे पाणी पिण्याचे प्रमाण अवलंबून असतं. पण रोज किमान 3-4 लिटर पाणी आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे.
कधी पाणी प्यायला नको
जेवण्याच्या पूर्वी पाणी, जेवण करत असताना किंवा जेवून झाल्यावर लगेचच पाणी प्यायला नको. यामुळे तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. तर उभे राहून पाणी प्यायला नको. असं केल्यास आपल्याला किडनी आणि ब्लैडरवर परिणाम होऊ शकतो.
कधी पाणी प्यायची योग्य पद्धत
सकाळी उठल्यावर उपाश्यापोटी 2-3 ग्लास पाणी प्यायला पाहिजे. जेवण्याच्या अर्धा तास आधी पाणी प्यायला पाहिजे. जेवत असताना मध्ये मध्ये पाणी प्यायला नको. तर जेवण झाल्यानंतर अर्धा तासांनी पाणी प्यायला हवं. जर तुम्हाला पचनक्रियाची समस्या असेल तर गरम पाणी पिणे योग्य आहे.