अप्पर लीप्सच्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

| Updated on: Mar 12, 2021 | 4:14 PM

अप्पर लीप्स काढण्यासाठी महिलांना पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची या प्रक्रियांची मदत घेतात.

अप्पर लीप्सच्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!
Follow us on

मुंबई : अप्पर लीप्स काढण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगची मदत घेतात. परंतु, कधीकधी कामामुळे पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ देखील मिळत नाही. अशा परिस्थितीत, आपण देखील असे विचार करता का? घरचे घरी अप्पर लीप्स काढू शकतो तर आज आम्ही तुम्हाला पार्लरमध्ये न जाता अप्पर लीप्स घरामध्ये असलेल्या साहित्याने कशा काढायच्या हे सांगणार आहोत आणि विशेष म्हणजे यामुळे काहीच त्रास देखील होत नाही. चला तर मग बघूयात (Easy Home Remedies To Remove Uppar Lips Hairs At Home)

-अंडयाचा पांढरा भाग एका वाटीमध्ये काढा त्यामध्ये कॉर्न फ्लोर आणि साखर टाका हे मिश्रण व्यवस्थित मिसळा. त्यानंतर अप्पर लीप्सला ही पेस्ट लावा आणि साधारण 20 ते 30 मिनिटांनंतर हे पाण्याने धुवा.

-एका वाटीत लिंबाचा रस घ्या आणि त्यामध्ये एक चमचे साखर घाला साखर चांगली विरघळू द्या हे मिश्रण 15 मिनिटे तसेच ठेवा आणि मग पाण्याने धुवा.

-अप्पर लीप्सला करण्यासाठी एक चमचे हळद 2 चमचे दुधात मिसळून पेस्ट तयार करा. यानंतर, ही पेस्ट अप्पर लीप्सला लावा. 15 मिनिटे सोडा तसेच ठेवा आणि पाण्याने धुवा.
वॅक्सिंग चेहर्‍यावरील नको असलेले केस काढते, मात्र या पद्धतीत प्रचंड वेदना होतात. चेहऱ्यावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात.

याशिवाय त्वचेवर खाज आणि पुरळ येण्याची समस्या देखील उद्भवते. तथापि, घरगुती उपाय केल्याने तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही आणि केसही सहजपणे काढले जातील. त्यामुळे आता चेहऱ्यावरील केस काढून टाकण्यासाठी आपल्याला पार्लरमध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही. आपण स्वत: चेहऱ्यावरचे नको असलेले केस घरीच काढू शकता. यामुळे आपला वेळ तसेच पैशाची देखील बचत होईल.

संबंधित बातम्या : 

(Easy Home Remedies To Remove Uppar Lips Hairs At Home)