कोरोना काळात कारलं खा अन् हेल्दी राहा; कारलं कसं खायचं?, जाणून घ्या!

| Updated on: May 28, 2021 | 2:57 PM

कारले चविला जरी कडू असले तरी आपल्या आरोग्यासाठी कारले खूप फायदेशीर आहे. कारले अँटीवायरल आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे.

कोरोना काळात कारलं खा अन् हेल्दी राहा; कारलं कसं खायचं?, जाणून घ्या!
कारले
Follow us on

मुंबई : कारले चविला जरी कडू असले तरी आपल्या आरोग्यासाठी कारले खूप फायदेशीर आहे. कारले अँटीवायरल आणि प्रतिजैविक गुणधर्मांनी समृद्ध आहे. यामध्ये व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए देखील मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन-सी आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. सध्याच्या कोरोना काळात तर आहारात कारले जास्तीत-जास्त घेतले पाहिजेत. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. (Eat Bitter and stay healthy during Corona)

आहारात कारले तळून, भाजून, भाजी आणि रस करून घेऊ शकतो. शक्यतो आपण कारल्याची भाजीच करतो. मात्र, कोणत्याही पध्दतीने कारले आपल्या शरीरात जाणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे बरेच लोक कारल्याची शेव देखील करू खातात. कारले इतके कडू असते की, आपण फक्त कारल्याचा रस पिऊ शकत नाही. कारल्याचा रस घरी तयार करण्यासाठी त्या रसामध्ये आपण हिरवे सफरचंद, काकडी, लिंबू, पालक, कारले, टोमॅटो आणि लसूण यासारख्या निरोगी घटक या रसात मिक्स करू शकतो.

कारल्याचा रस तयार करण्याची दुसरी रेसिपी म्हणजे आपण कारले आणि बीट मिक्स करून देखील कारल्याचा रस तयार करू शकतो. कारले आणि बीटचा रस तयार करण्यासाठी अर्धे कारले आणि एक बीट घ्या. त्यामध्ये लिंबू देखील मिक्स करा. कारले आणि बीटचा रस तयार करताना त्यामध्ये थोडे पाणी घाला. हा रस दररोज सकाळी पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. सध्याच्या कोरोना काळात तर हा रस आपण दररोज सकाळी पिला पाहिजे.

बीट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात आढळणारे अँटिऑक्सिडेंटस शरीराला रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटामिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढत असेल तर आपण बीटच्या रसाचे सेवन करू शकता. यासाठी ते खूप फायदेशीर आहेत. बीटमध्ये मिनरल सिलिका असते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.

संबंधित बातम्या : 

Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Eat Bitter and stay healthy during Corona)