रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि बऱ्याच रोगांवर चवळीची पालेभाजी प्रभावी !

| Updated on: May 04, 2021 | 7:07 AM

कोरोनाच्या काळात चवळीची पालेभाजी भाजी खाणे खूप फायदेशीर आहे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि बऱ्याच रोगांवर चवळीची पालेभाजी प्रभावी !
चवळी
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या काळात चवळीची पालेभाजी भाजी खाणे खूप फायदेशीर आहे. चवळीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, लोह, कॅल्शियम आणि प्रथिने यासारखे बरेच पोषक घटक असतात. आयुर्वेदात अनेक रोगांसाठी चवळी उपयुक्त आहे. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक वाढवण्यासाठी चवळी फायदेशीर आहे. (Eat Chaulai saag to boost immunity power)

पोटासाठी फायदेशीर – चवळीची पालेभाजी खाणे पोटातील आजारांसाठीही फायदेशीर आहे. हे बद्धकोष्ठता आणि पोट संबंधित इतर समस्यांना दूर करण्यास मदत करते. हे पाचक प्रणाली मजबूत करते. पोटाच्या अनेक समस्यांसाठी चवळी फायदेशीर आहे.

वजन कमी करण्यासाठी – चवळीचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलिनची पातळी कमी होते. चवळी खाल्ल्यानंतर तुम्हाला बर्‍याच वेळ पोट भरल्यासारखे वाटेल. यामुळे ज्यांना वजन कमी करायचे आहे. त्यांनी आपल्या आहारात चवळीचे सेवन करावे.

केसांसाठी – चवळीमध्ये लायझिन आणि अमीनो अॅसिड असते. हे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. याचा उपयोग केल्याने केस काळे राहतात. चवळीचा रस पिल्याने केस गळतीचा त्रास देखील कमी होतो.

त्वचेसाठी – चवळी आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. जर आपण ते त्वचेवर लावले तर खाज सुटणे बंद होते. चवळीचा आहारात समावेश केलातर आपली त्वचा चमकदार होते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी – चवळीमध्ये व्हिटॅमिन सी आणि प्रथिने असतात. ते शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हे संक्रमण रोग होण्यापासून रोखतात. कोरोना कालावधीमध्ये अनेक डाॅक्टर चवळी खाण्याचा सल्ला देतात.

डोळ्यांसाठी – चवळीमध्ये जीवनसत्व सी आणि ए असते. डोळ्यांच्या समस्यांसाठी रामबाण उपाय आहे. निरोगी डोळ्यांसाठी शरीरात व्हिटॅमिन सी आणि ए ची कमतरता असू नये.
हाडे मजबूत करण्यासाठी – हाडे मजबूत करण्यासाठी भरपूर कॅल्शियमची आवश्यक असते. चवळी या हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर कॅल्शियम असतात. चवळीचे नियमित सेवन केल्यास हाडे मजबूत होतात.

संबंधित बातम्या : 

Gulkand Benefit | वजन कमी करण्यापासून ते अनेक समस्यांवर गुणकारी ‘गुलकंद’, जाणून घ्या याचे फायदे..

(Eat Chaulai saag to boost immunity power)