अंड्यापासून बनवलेले सलाद वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, आजच ट्राय करा !

| Updated on: Mar 19, 2021 | 9:39 AM

अंडी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

अंड्यापासून बनवलेले सलाद वजन कमी करण्यासाठी फायदेशीर, आजच ट्राय करा !
सलाद
Follow us on

मुंबई : अंडी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा (High Quality Protine) चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित होते. अंडी खाल्ल्याने आपले वजन देखील कमी होते. आज आम्ही तुम्हाला अंड्याच्या पाच सलाद रेसिपी सांगणार आहोत. जास्त करून सलाद कच्चे खाल्ले जातात. मात्र, जेव्हा आपण सलादमध्ये अंडी समाविष्ट करणार आहोत त्यावेळी अगोदर अंडी उकडून घ्या. (Eat egg salad to lose weight)

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

अंडी आणि सलादसोबत खाल्ले तर आपल्याला भूक देखील लागत नाही. यामुळे आपले वजन कमी होण्यास देखील मदत होते. आहारतज्ज्ञांच्या मते, सलाडमध्ये कधीही मीठ घालू नये. जर तुम्हाला त्यावर मीठ टाकून खाणे आवडत, असेल तर त्यासोबत सैंधव मीठ किंवा रॉक सॉल्ट वापरण्याचा प्रयत्न करा. तथापि, जास्तवेळ आधीच कापून ठेवेलेल सलाड सेवन करू नये. पावसाळ्यामध्ये बॅक्टेरिया खूप सक्रिय असतात. म्हणूनच, या दिवसांत सलाद अधिक वेळ उघडे ठेऊ नये, तसेच कमी प्रमाणात खावे.

सलाद खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोट साफ राहते. फायबर्सने परिपूर्ण असे सलाद खाल्ल्याने पोटातील जमा विषारी घटक शरीराबाहेर फेकले जातात त्यामुळे आतडी आतून स्वच्छ होऊन, बद्धकोष्टता दूर होते आणि पचनासंबधित सर्व विकारांना आळा बसतो. यातील भाज्यांमध्ये सर्व प्रकारची जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असल्यामुळे, शरीरातील जीवनसत्वांचा अभाव सलाद खाल्ल्याने दूर होतो. वजन कमी करण्यासाठी सलाड उत्तम. जेवण कमी करून सलादचे प्रमाण वाढवल्याने पोटही भरते, त्याचबरोबर वजनही वाढत नाही.

संबंधित बातम्या : 

Food | थंडीच्या दिवसांत आहारात ‘या’ गोष्टी समविष्ट करा आणि आजारांपासून दूर राहा!

Health | मधुमेहाची चिंता सतावतेय? या 5 पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टेन्शन मुक्त व्हा!

Snoring Issue | जाणून घ्या का उद्भवते घोरण्याची समस्या? ‘या’ सोप्या पद्धती वापरा आणि शांत झोपेचा आनंद घ्या…

(Eat egg salad to lose weight)