रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फळे आणि भाज्यांचा आहारात करा समावेश, होतील अनेक फायदे !

| Updated on: Apr 22, 2021 | 10:01 AM

उन्हाळ्याच्या हंगामात आपले आरोग्य सांभाळणे सर्वात महत्वाचे असते. यादरम्यान भरपूर भाज्या आणि ताजे फळे घेऊ आहारात घ्यायला हवीत.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी फळे आणि भाज्यांचा आहारात करा समावेश, होतील अनेक फायदे !
Follow us on

मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामात आपले आरोग्य सांभाळणे सर्वात महत्वाचे असते. यादरम्यान भरपूर भाज्या आणि ताजे फळे आहारात घ्यायला हवीत. यामुळे आपण अनेक रोगांपासून दूर राहतो आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, उन्हाळ्याच्या हंगामात नेमक्या कोणत्या भाज्या आणि फळे आहारात घेतली पाहिजेत. चला तर मग बघूयात…(Eat fruits and vegetables to boost your immune system)

काकडी
काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.काकडीमध्ये भरपूर कॅलरी असतात काकडी खाल्लाने शरीरामध्ये चरबी निर्माण होत नाही. म्हणूनच काकडी खाल्ल्याने देखील नियंत्रणात राहते. दिवसातून एकदा तरी आपण काकडी खाल्ली पाहिजे. उन्हाळ्यात सर्वांचीच त्वचा कोरडी होते. काकडीमध्ये सिलिकॉन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे प्रमाण भरपूर आहे. हे तीन पौष्टिक घटक त्वचेसाठी आवश्यक आहेत. काकडी खाल्ल्याने त्वचा स्वच्छ होते. काकडीमध्ये व्हिटॅमिन सी, बीटा कॅरोटीन सारख्या अँटी-ऑक्सिडंट असतात.

कलिंगड
कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. यामुळे कलिंगड खाल्ल्यानंतर मन शांत राहते आणि शरीराला उर्जाही मिळते. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. कलिंगड नियमीत खाल्लावर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित राहते. ज्यामुळे आपल्याला हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असू नये. कारण पाण्याचे प्रमाण कमी होताच आपण आजारी होऊ शकतो. म्हणून शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी कलिंगड हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी शरीरातील अनेक खनिजे आणि जीवनसत्त्वे यांची कमतरता पूर्ण करू शकते. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी आहे. सध्याचा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये तर स्ट्रॉबेरी दररोज खाल्ल्यी पाहिजे. स्ट्रॉबेरीमुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. ज्या लोकांची प्रतिकार शक्ती कमी आहे अशा लोकांनी तर अगोदर आपल्या आहारात स्ट्रॉबेरी घेतली पाहिजे. सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपण कधीही स्ट्रॉबेरी खाऊ शकतो. अनेकांचा असा समज आहे की, स्ट्रॉबेरी खाल्ल्याने सर्दी खोकला येतो. मात्र, असे काही होत नाहीतर स्ट्रॉबेरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगली आहे.

दुधी भोपळा
दुधी भोपळ्याला आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व आहे. हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर आहे. आठवड्यातून तीन वेळा दुधी भोपळ्याचा रस पिल्याने तुमचे हृदय निरोगी राहते. यासह, आपले रक्तदाब देखील नियंत्रित राहते. दुधी भोपळ्याचा रस तुमचे वजन कमी करण्यासही मदत करते. लोह, जीवनसत्त्वे आणि पोटॅशियम समृद्ध आहे. रोज दुधी भोपळ्याचा रस घेतल्याने वजन कमी होते. आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे लोकांचे केस अकाली पांढरे झाले आहेत. या प्रकरणात, आपण दररोज एक ग्लास दुधी भोपळ्याचा रस घेऊ शकता. हे आपल्या केसांचा रंग आणि पोत अखंड ठेवेल.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी, लाइकोपीन आणि पोटॅशियम हे घटक पर्याप्त प्रमाणात आढळतात. याशिवाय टोमॅटोमध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स आणि फायबरची मात्राही भरपूर असते. हे व्हिटामिन ए, व्हिटामिन सी, व्हिटामिन ई आणि व्हिटामिन के चा खूप चांगला स्त्रोत आहे. ही सर्व व्हिटामिन्स आरोग्यासाठी खूप चांगली मानली जातात. टोमॅटोमध्ये पोटॅशिअम आणि मँगनीज भरपूर प्रमाणात असते. तसंच टोमॅटो कॅल्शिअम, आर्यन, कॉपर, मॅग्नेशिअम, फॉस्फरस आणि झिंक यासारख्या तत्त्वांनी युक्त असतो. टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणही आढळतात, टोमॅटोमधील लाल रंग हा त्यातील लाइकोपीनमुळे प्राप्त होतो, जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याच कारणामुळे कच्चा टोमॅटो पिकल्यानंतर अजून प्रभावकारक ठरतो.

भेंडी

भेंडीमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम ही जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे भेंडीची भाजी खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात. भेंडीमध्ये युगेनॉल मोठ्या प्रमाणाच आढळते. हे डायबिटीजच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. भेंडी खाल्ल्याने शरीरात ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित राहते. भेंडी खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपल्या आतड्यामधील विषारी तत्व बाहेर पडतात. यामुळे तुमचे आतडे चांगले राहण्यास मदत होते. भेंडीमध्ये विटामिन सी देखील आढळते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते आणि आजारांपासून सुटका होते. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी अर्धवट शिजवलेली भेंडीची भाजी खायला हवी. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं.

संबंधित बातम्या : 

(Eat fruits and vegetables to boost your immune system)