हिरवी शिमला मिरची खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !

| Updated on: Apr 29, 2021 | 9:58 AM

आपल्यापैकी जवळपास सर्वचजणांच्या आहारात शिमला मिरची असते. मात्र, आपण साधारण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शिमला मिरची खातो.

हिरवी शिमला मिरची खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा !
शिमला मिरची
Follow us on

मुंबई : आपल्यापैकी जवळपास सर्वजणांच्या आहारात शिमला मिरची असते. मात्र, आपण साधारण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा शिमला मिरची खातो. मात्र, सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण आपल्या आहारात दररोज शिमला मिरची घेतली पाहिजे. त्यामध्येही हिरवी शिमला मिरची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, कॅरोटीनोइड मोठ्या प्रमाणात आढळतात. (Eat green capsicum and boost the immune system)

शिमला मिरचीमध्ये कॅलरी असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. यामुळे आहारात जास्त-जास्त हिरवी शिमला मिरचीचा समावेश करा. शिमला मिर्ची खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते. बाजारात हिरव्या, पिवळ्या आणि लाल रंगाच्या शिमला मिरची मिळतात. मात्र, आपल्या आरोग्यासाठी हिरव्या रंगाची शिमला मिरची चांगली असते.

आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर आपण शिमला मिरची आहारात दररोज घेतली पाहिजे. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी लोह वाढवण्यास मदत करते. सर्वात मुख्य म्हणजे शिमला मिरची खाल्ल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो. जरी आपल्याला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर, शिमला मिरची आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. शिमला मिरची रक्तातील साखरेसाठी आवश्यक योग्य पातळी राखते आणि मधुमेहापासून तुमचे रक्षण करते.

शिमला मिरची एंटी-ऑक्सिडेंट, अँटीइन्फ्लेमेटरी घटक आणि सल्फर, कॅरोटीनॉइड लाइकोपीन देखील असते. यामुळे कर्करोगासारख्या आजारांना टाळण्यासही फायदेशीर आहे. जर आपल्याला गुडघे आणि सांध्यामध्ये समस्या असतील तर शिमला मिर्ची सेवन करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. शिमला मिरची खाणे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. शिमला मिरचीमध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचेसंदर्भात असलेल्या वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते.

संबंधित बातम्या : 

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

Dark Circle Home Remedy | डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? ‘या’ टिप्स नक्की वापरून पाहा…

(Eat green capsicum and boost the immune system)