मुंबई : सध्याच्या कोरोनाच्या काळात आरोग्याची विशेष काळजी ही घेतली पाहिजे. हेल्दी आणि निरोगी राहण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे, निरोगी आहारा तसेच या काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर अधिक भर दिला पाहिजे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही काही खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होईल. (Eat these 4 special drinks to boost your immune system)
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी हे अतिशय चांगले आहे. यासाठी आपल्याला दोन आंबे, दोन काकडी, हळद, आले, 1 चमचे मध, ताज्या लिंबाचा रस आणि वेलची हे साहित्य लागणार आहे. आंबे आणि काकडी बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करा. हे अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यामध्ये शेवटी आले घाला आणि या मिश्रणात पाणी घाला. हे पेय दिवसातून दोन वेळा पिणे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
कलिंगड खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे उन्हाळ्यात शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जातात. मात्र, तुम्ही जर सकाळी एक ग्लास कलिंगडाचा रस पिला तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कोरोनाच्या काळात स्वत: ला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे फार महत्वाचे आहे. म्हणून, प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यासाठी कलिंगड हा एक चांगला पर्याय आहे.
गाजरात 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी बीट आणि गाजरचा रस घेणे खूप चांगले आहे. बीटमध्ये कॅरोटीन आणि अल्फा यासारखे पौष्टिक पदार्थ असतात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. बीट आणि गाजरचा रस बनवा आणि त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीरात उपस्थित विषारी पदार्थ काढून टाकते.
(टीप : सेवानापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Food | ‘या’ पदार्थांना दूर ठेवा आणि हिवाळ्याच्या काळात सर्दी-खोकल्यापासून सुरक्षित राहा!
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(Eat these 4 special drinks to boost your immune system)