मुंबई : सध्याच्या कोरोना काळात आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अनेकांनी आपल्या जीवनामध्ये अनेक बदल देखील केले आहे. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे व्हिटॅमिन ई आपण आहारात व्हिटॅमिन ई जास्त घेतले पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (Eat these foods to increase vitamin E during the corona period)
आपल्या शरीरातील व्हिटॅमिन ई वाढवण्यासाठी आपण आहारात डाळिंब घेतले पाहिजे. डाळिंब फळ दिसायला जितके सुंदर आहे, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. डाळिंब खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याशिवाय टाईप-2 डायबिटीसशी लढण्यातही यामुळे बरीच मदत मिळते. डाळिंबामध्ये व्हिटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात आढळतात. यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्म देखील आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
बदामांमध्ये प्रथिने, फायबर, व्हिटामिन ई, कॅल्शियम, जस्त सारखे अनेक पौष्टिक घटक असतात, जे शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात. दररोज आपल्या नाश्त्यामध्ये बदामांचा समावेश करून आपण रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकतात. बदामांमध्ये उच्च फायबर, असंतृप्त चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, बदाम कमी ग्लायसेमिक निर्देशांक श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत, ज्याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी आहे.
लाल शिमला मिर्चीत जीवनसत्त्वे सी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन के, फायबर आणि बीटा कॅरोटीन यामध्ये भरपूर प्रमाणात आढळतात. कॅप्सिकममध्ये कॅलरी असतात, त्यामुळे कोलेस्टेरॉल वाढत नाही. व्हिटॅमिन सीचे सेवन रोगप्रतिकारशक्ती सुधारते. कोलेस्टेरॉलची पातळी कमी करून रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत होते. यामुळे आहारात जास्त-जास्त लाल शिमला मिर्चीचा समावेश करा. शिमला मिर्ची खाल्ल्याने वजन कमी होण्यास देखील मदत होते.
(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी बदाम, लाल शिमला मिर्ची आणि मासे फायदेशीर, वाचा !
चहा-कॉफी की बियर-वाईन, काय पिता तुम्ही… त्याचे फायदे-तोटे तुम्हाला माहिती आहे का?
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Eat these foods to increase vitamin E during the corona period)