मुंबई : सध्याच्या कोरोना परिस्थितीमध्ये हेल्दी डाएट घेतला पाहिजे. कारण हेल्दी डाएटमुळे आपण आजारांना आपल्यापासून दूर ठेऊ शकतो. संपूर्ण देशात कोरोनाने कहर केला आहे. यामुळे या दिवसात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे अत्यंत महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण आहारात व्हिटामिन के आणि प्रोटीनयुक्त अन्न घेतले पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. (Eat these fruits to increase vitamin K in the body)
मटार
मटार खाण्यासाठी चवदार असतात. केवळ चविष्ठच नाही, तर त्यात बरीच पोषक द्रव्ये देखील असतात. मटारमध्ये व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असते. तसेच व्हिटॅमिन्स ए, बी 1, बी 6, सी आढळतात. म्हणूनच मटारला व्हिटॅमिन्स आणि ऊर्जेचा उत्तम स्त्रोत अर्थात ‘पॉवरहाऊस’ देखील म्हटले जाते. मटारमध्ये अत्यंत कमी कॅलरी असतात. तर, शरीरासाठी पोषक ठरणारे फायबर, प्रथिने, मॅंगनीज, लोह आणि फोलेट हे घटक भरपूर प्रमाणात आढळतात.
किवी
किवी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, किवीमध्ये 173 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, तसेच किवीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन के देखील असते. या व्यतिरिक्त पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, अँटि-ऑक्सिडंट्सचा एक चांगला स्रोत किवी आहे. किवी खाल्ल्याने पाचन शक्तीत वाढ होते. तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते. किवीमुळे सेरोटोनिन हार्मोन्स वाढतात. हे हार्मोन्स शांत झोपेसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात.
पालक
पालकामध्ये कॅलरी, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, रेशे असतात. पालकामध्ये खनिज लवण म्हणजे कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी, के भरपूर प्रमाणात असते. विशेष म्हणजे पालक खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. पालकाचं सेवन केल्यामुळे शरीरातील फ्री रेडिकल्सला बाहेर काढण्यास मदत होते. या फ्री रेडिकल्समुळे कॅन्सरसारखे रोग होतात. पालकमध्ये ‘क’ जीवनसत्वाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हाडं मजबूत होतात.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीला बर्याच लोकांनी सुपरफ्रूट देखील म्हटले आहे. 1 कप स्ट्रॉबेरीमध्ये सुमारे 85 मिलीग्राम व्हिटामिन सी असते, ज्यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त त्यात हेल्दी फोलेट आणि अँटीऑक्सिडेंट देखील आढळतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय स्ट्रॉबेरी खाण्याचा आणखी एक फायदा म्हणजे ती नैसर्गिक पद्धतीने आपले दात पांढरे करण्यात मदत करते.
अॅवकाडो
अॅवकाडो हे फळ आरोग्यासाठी चांगले आणि एक पौष्टिक फळांपैकी आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचे महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे आहेत. विशेष म्हणजे यामध्ये व्हिटामिन के मोठ्या प्रमाणात असते. यामुळे सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण आहारात अॅवकाडो घेतले पाहिजे. अॅवकाडो सेवन करणाऱ्यांना तांबे, मॅग्नेशियम, क जीवनसत्त्व, फोलेट, कबरेदके मिळतात. अॅवकाडो सेवनाने इन्शुलिन व होमोसिस्टीनचे प्रमाण योग्य राहते.या फळामुळे पचन सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते.
डाळिंब
डाळिंब खाण्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याशिवाय टाईप-2 डायबिटीसशी लढण्यातही यामुळे बरीच मदत मिळते. डाळिंबामध्ये व्हिटामिन ए, सी आणि ई भरपूर प्रमाणात आढळतात. यात अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल आणि अँटी-ट्यूमर गुणधर्म देखील आहेत, जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. डाळिंब तुमच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी सुधारण्यास मदत करतो. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडेंट उपस्थित असल्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते. यासह, हे आपल्या शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाण देखील कमी करते.
(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी नेहमीच एखाद्या विशेषज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
संबंधित बातम्या :
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Eat these fruits to increase vitamin K in the body)