नवी दिल्ली- वजन कमी करण्यासाठी तसेच फिट राहण्यासाठी (to be fit) बऱ्याचशा व्यक्ती जिममध्ये तासनतास व्यायाम, वर्कआऊट (workout) करतात. वर्कआऊट केल्यानंतर आपली एनर्जी (low energy) कमी होते. अशा वेळी तुम्ही आहारात काही हेल्दी पदार्थांचा समावेश करू शकता. वर्कआऊट केल्यानंतर या पदार्थांचे सेवन केल्यानंतर एनर्जी मिळते. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही कोणते पदार्थ खाऊ शकता, ते जाणून घेऊया.
पनीर –
पनीर हे प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. ते स्नायूंसाठीही खूप फायदेशीर आहे. वर्कआउट केल्यानंतर तुम्ही पनीरचे सेवन करू शकता. कच्चे पनीर किंवा सॅलॅडमध्ये त्याचा वापर करून तुम्ही खाऊ शकता. पनीर खाल्ल्याने ते शरीराला ऊर्जा देण्याचे कार्य करते.
ड्रायफ्रूट्स –
ड्रायफ्रूट्समध्ये अनेक चांगले गुणधर्म असतात, ते आपल्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामुळे वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही ड्रायफ्रुटसचे सेवन करू शकता. वर्कआउटनंतर कमी झालेली एनर्जी भरून काढण्याचे काम ते करतात. तसेच आपले शरीरही मजबूत करण्यास मदत करतात. काजू, बदाम आणि पिस्ता यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. ते जीवनसत्त्वे आणि खनिजांनी समृद्ध असतात.
फळे –
तुम्ही फळांचाही आहारात समावेश करू शकता. हंगामानुसार येणारी विविध फळे आपल्याला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करतात. त्यांचे सेवन केल्याने पोटही बराच वेळ भरलेले राहते व सारखी भूक लागत नाही. त्यामुळे आपले वजनही नियंत्रित राहण्यास मदत होते. वर्कआऊट केल्यानंतर तुम्ही सफरचंद, केळी आणि ॲवोकॅडो इत्यादी फळांचे सेवन करू शकता. ते आपल्याला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात.
हिरव्या पालेभाज्या –
हिरव्या पालेभाज्या या सर्वांच्याच आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यात अनेक पौष्टिक तत्वं असतात. हिरव्या पालेभाज्यांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. वर्कआउटनंतर केल, पालक आणि ब्रोकोली इत्यादींचे सेवन करू शकता. त्या खाल्याने तुम्हाला ऊर्जा मिळते. हिरव्या भाज्याचा हा वर्कआउटनंतर खाण्यासाठी हा एक निरोगीव व चांगला पर्याय आहे.