Food For Healthy Heart: निरोगी हृदयासाठी रोज खा ‘ हे ‘ पदार्थ

| Updated on: Oct 11, 2022 | 10:23 AM

हृदय निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायामासोबतच पौष्टिक, सकस आहार घेणेही गरजेचे आहे. अशा वेळी तुम्ही तुमच्या आहारात अनेक हेल्दी पदार्थांचा समावेश करू शकता.

Food For Healthy Heart: निरोगी हृदयासाठी रोज खा  हे  पदार्थ
Follow us on

हृदय हे शरीरातील सर्वात महत्वपूर्ण अवयवांपैकी एक आहे. दररोज व्यायाम केल्याने आणि सकस व पौष्टिक आहाराचे सेवन केल्याने हृदय (heart) निरोगी राहते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या डाएटमध्ये (diet) अनेक पदार्थांचा समावेश करू शकता. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. हृदयाचे अनियमित ठोके आणि श्वास लागणे अशा हृदयाशी संबंधित समस्यांपासून आपले संरक्षण करण्याचे काम ते करतात. अशावेळी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत (lifestyle) बदल करणे गरजेचे आहे. निरोगी हृदयासाठी कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकतो, ते जाणून घेऊया.

चांगल्या प्रतीचे तेल –
स्वयंपाकासाठी चांगल्या प्रतीचे तेल वापरावे. तुम्ही गायीचे शुद्ध देशी तूप आणि नारळाचे तेल, अन्न शिजवण्यासाठी वापरू शकता. हे तेल चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात. तसेच जजळजळ, सूज इत्यादी समस्या दूर करतात.

ओमेगा 3 असलेले पदार्थ –
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा ३ ने समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता. ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात. तसेच हृदय निरोगी ठेवतात. त्यासाठी तुम्ही आहारात फ्लेक्ससीड्स, अक्रोड आणि चिया सीड्स यांचा समावेश करू शकता.

हे सुद्धा वाचा

बीट –
तुम्ही बीटाचा रस आणि कोशिंबीर स्वरुपात त्याचे सेवन करू शकता. त्यामध्ये आयर्न (लोह) भरपूर प्रमाणात असते. बीटाच्या सेवनाने शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होत नाही. बीटामध्ये ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे हृदयरोगाचा धोका कमी करण्याचे काम करतात.

ऑर्गॅनिक चहा –
तुम्ही नियमितपणे ऑर्गॅनिक चहाचे सेवन करू शकता. यामध्ये व्हाइट टी आणि माचा टी यांचा समावेश आहे. या चहामध्ये ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्म भरपूर प्रमाणात असतात. ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे काम करतात.

फळं –
तुम्ही द्राक्षं, डाळिंब आणि बेरीज यांसारख्या फळांचा आहारात समावेश करू शकता. त्यामध्ये ॲंटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे हृदय निरोगी ठेवण्याचे कार्य करतात.

व्हिटॅमिन ई आणि मॅग्नेशिअमने समृद्ध असलेले पदार्थ –
यामध्ये ॲव्होकॅडो, बदाम, शेंगदाणे आणि तीळ यांसारखे पदार्थ असतात. हे पदार्थ फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी कार्य करतात. ड्रायफ्रुट्स, बिया, हिरव्या पालेभाज्या आणि कोको यांसारख्या पदार्थांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर प्रमाणात असते. ते उच्च रक्तदाब नियंत्रित करण्याचे काम करतात.

पोटॅशिअम आणि व्हिटॅमिन केने समृद्ध असलेले पदार्थ –
तुम्ही तुमच्या आहारात केळी, ॲव्होकॅडो आणि भोपळा यासारख्या पोटॅशिअमयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. तसेच हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोली आणि ॲव्होकॅडो इत्यादी व्हिटॅमिन के ने समृद्ध असलेले पदार्थही नियमितपणे सेवन करावेत.