मुंबई : केळी खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत चांगले आहे. मात्र, बऱ्याच लोकांना सवय असते सकाळी उठल्या-उठल्या केली खाण्याची मात्र, आपल्या शरीरासाठी हे अत्यंत धोकादायक आहे. केळी कधीही उपाशी पोटी खाऊ नये. सकाळी अगोदर काहीतरी खावे मगच केळी खावी. केळीमध्ये 100 कॅलरी उर्जा असते, ज्यामुळे तुमचे शरीर दिवसभर सफुर्तीवान राहते. (Eating bananas on an empty stomach is dangerous to health)
या व्यतिरिक्त, त्यात असलेले इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. केळी ही आपल्या आरोग्यासाठी चांगल्या असणाऱ्या फळांपैकी एक आहे. केळ्यात अँटीऑक्सिडंट्स, पाण्याचे आणि फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. पण अनेकांना माहित नाही की केळी खाल्याने अन्नपचन होण्यास मदत होते.
-केळी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे शरीरात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण असमतोल होते.
-केळीमध्येही पोटॅशियम आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळतात. परंतु केळी देखील आम्ल आहे. तज्ञांच्या मते, रिकाम्या पोटी अम्लीय पदार्थ घेतल्याने पाचन समस्या उद्भवू शकते.
-केळीमध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने रक्तातील दोन्ही पोषक द्रव्यांचे प्रमाण वाढते, जे तुमच्या हृदयालाही नुकसान करते.
-केळी खाल्याने ऊर्जा मिळते, परंतु रिकाम्या पोटी खाल्ल्याने आपल्याला केवळ थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते. अशा वेळी तुम्हाला थकवा व सुस्तपणा वाटू शकतो.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
सावधान! ताप आणि खोकलाच नाही, तर पोटासंबंधित ‘हे’ विकारही ठरु शकतात कोरोनाचे लक्षणेhttps://t.co/3h2V1upR37 #Coronasymptoms #coronavirus #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Eating bananas on an empty stomach is dangerous to health)