मुंबई : आपल्या आरोग्यासाठी चने खाणे खूप फायदेशीर आहे. त्यामध्येही रात्री भिजवलेले चणे सकाळी उठून खाल्ले तर त्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतील. खरं तर चण्यामध्ये अनेक पौष्टिक पदार्थासोबतच व्हिटॅमिन आणि खनिजे असतात. चणे खाणे फक्त आपल्या आरोग्यासाठीच नाही तर चणे खाल्ल्याने आपले वजन देखील कमी होण्यास मदत होते. (Eating Chickpea for health Beneficial)
-भिजवलेले चणे पाचन तंत्र देखील मजबूत बनविते. चण्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. फायबर प्रामुख्याने अन्न पचवण्यासाठी कार्य करते. भिजलेली चणे खाल्ल्याने पचनसंस्था देखील बळकट होते.
-लठ्ठपणा कमी करण्यासाठी चणे खाणे खूप फायदेशीर आहे. कारण चण्यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स असते, जे भूक कमी करून वजन कमी करण्यास मदत करते. यामुळे ज्या लोकांना लठ्ठपणा कमी करायचा आहे त्यांनी आपल्या आहारात चणे घ्यावेत
-भिजवलेले चणे खाल्ल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो. चन्यामध्ये बुटीरेट नावाचे एक अॅसिड असते. जे कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते.
-डोळ्यांसाठी चणा देखील फायदेशीर आहे, कारण त्यात कॅरोटीन घटक आहे. हा घटक प्रामुख्याने डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते, ज्यामुळे डोळ्यांची निरोगी क्षमता टिकते.
-ज्या लोकांच्या शरीरात रक्ताची कमी आहे त्यांनी तर रोज सकाळी एक वाटी भिजवलेले चणे खाल्ले पाहिजेत. त्यामुळे शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मदत होते.
-चणामध्ये व्हिटॅमिन-ए, बी आणि व्हिटॅमिन-ई आढळतात जे केसांना निरोगी आणि मजबूत ठेवतात. त्यामुळे दररोज सकाळी चने खाल्ले पाहिजेत.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Eating Chickpea for health Beneficial)