अंजीर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर !

| Updated on: Apr 12, 2021 | 5:30 PM

अंजीर खाणे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीर जितके चवीला अद्वितीय आहे, ते आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे.

अंजीर खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर !
Follow us on

मुंबई : अंजीर खाणे तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. अंजीर जितके चवीला अद्वितीय आहे, ते आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. हे एक असे फळ आहे जे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंतच्या सर्व मुलांना खूप आवडते. मात्र, काहीजण अंजीर खाणे टाळतात कारण त्यांना अंजीराचे नेमके फायदे माहिती नसल्यामुळे आज आम्ही आपल्याला या फळाच्या काही महत्त्वाच्या फायद्यांविषयी सांगणार आहोत. दररोज अंजीर आपल्या आहारात घेतले तरी ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. (Eating Common fig is good for health)

-अंजीर खाणे आपल्या आरोग्याबरोबरच त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. कारण अंजीरमध्ये असलेले घटक आपली त्वचा चांगली ठेवण्याचे काम करते.

-जे लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशांनी देखील आपल्या आहारात अंजीराचा समावेश करावा यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

-कोणत्याही प्रकारच्या तापात अंजीर सेवन करणे फायदेशीर मानले जाते, विशेषत: पोट खराब झाल्यास अंजीरचे सेवन लाभदायी ठरते.

-कच्च्या अंजीराची जीरे, मोहरी, कोथिंबीर घालून भाजी देखील करता येते. ही भाजी चवीला अत्यंत चांगली आणि चवदार लागते. यामुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्व व लोह यांचे प्रमाण व्यवस्थित राहण्यास मदत होते.

-अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो. पायांना जळवातांच्या भेगा पडल्या असतील तर कच्च्या अंजीराचा चीक लावल्यास लवकर भरून येतात.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Skin Care | नितळ-निरोगी त्वचेसाठी दररोज वापरा ‘ब्युटी ऑईल’, जाणून घ्या याचे फायदे…

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

(Eating Common fig is good for health)