मुंबई : हिरव्या भाज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. या भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. त्यामध्येही शेवगा ही भाजी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शेवग्याच्या शेंगेमध्ये अनेक अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे आपल्याला हंगामी संक्रमणापासून वाचवतात. शेवग्याच्या पानांमध्ये व्हिटामिन बी 6, व्हिटॅमिन सी, व्हिटामिन ए, व्हिटामिन ई, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, झिंक यासारखे पोषक घटक असतात. (Eating drumstick tree is beneficial for the skin)
-शेवग्याचे पाने दोन तीन दिवस उन्हात वाळू द्या त्यानंतर त्याचे पावडर तयार करा त्या पावडरमध्ये एक मोठा चमचा मध घाला आणि एक चमचा पाणी घाला. ही पेस्ट ओल्या किंवा कोरड्या केसांवर लावा आणि हलक्या हातानं टाळूचा मसाज करा. 20 ते 30 मिनिटांसाठी हे पॅक केसांमध्ये राहू द्या.
-केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आठवड्यातून दोनदा या पॅकचा वापर करावा. हा पॅक लावताना हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. ओल्या केसांवर हे पॅक लावा आणि आपल्या टाळूच्या त्वचेचा हलक्या हाताने मसाज करा.
-शेवगा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवग्याची शेंग खूप फायदेशीर ठरते. या झाडाच्या शेंग, साल आणि पानामध्ये मधुमेहाला प्रतिबंधित करणारे गुणधर्म आहेत. याचे नियमित सेवन केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळते.
-वाढते वजन कमी करण्यासाठी शेवग्याच्या भाजीचे सेवन करणे अतिशय लाभदायी ठरते. यात लठ्ठपणाविरोधी गुणधर्म आहेत जे वाढते वजन कमी करण्यात मदत करू शकतात.
-शेवग्याच्या पानांचा रस त्वचेसाठी अँटीसेप्टिक म्हणूनही वापरला जातो. शेवग्याच्या ताज्या पानांचे लेप करून शरीराच्या ज्या भागावर सूज असेल तिथे बांधल्यास सूज कमी होते.
संबंधित बातम्या :
Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!
Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!
Jamun Seeds | मधुमेहाच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरतील जांभळाच्या बिया, ‘या’ समस्यांवरही उपयोगी!#JamunSeeds | #diabetes | #health | #foodhttps://t.co/kZyjVRjoYD
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 25, 2021
(Eating drumstick tree is beneficial for the skin)