कोरोना काळात नाचणीचे पीठ खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर !

| Updated on: May 02, 2021 | 3:35 PM

नाचणी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

कोरोना काळात नाचणीचे पीठ खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर !
नाचणी
Follow us on

मुंबई : नाचणी खाणे हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. नाचणीमध्ये कॅल्शीयम, फायबर, कर्बोदके, लोह, व्हिटामिन सी, व्हिटामिन बी, अँटिऑक्सिडेंट्स आणि प्रथिने यासारखे अनेक पोषक घटक असतात. भाकरी, बिस्किटे, चिप्स, डोसा, उपमा, नाचणीच्या पिठाचे सूप देखील तयार करून आपण नाचणीचा आपल्या आहारात समावेश करू शकतो. (Eating finger millet flour during corona is more beneficial for health)

दररोज आपल्या आहारात दोन वेळा तरी नाचणीची भाकर असली पाहिजे. नाचणी पचण्यासही चांगली आहे. सध्याच्या कोरोना काळात आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली तर आपण कोरोनापासून दूर राहू शकतो. विशेष म्हणजे नाचणीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते. बाजारामध्ये नाचणी किंवा नाचणीचे पीठ सहजपणे मिळते.

नाचणीचे पीठ आपल्या तत्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. नाचणीमध्ये अँटी मायक्रोबियल, कॅरोटीनोईड आणि अमीनो आम्ल असतात, ज्यामुळे केस गळणे, डँड्रफ आणि टक्कल या समस्या कमी होण्यास मदत होते. नाचणीचा हेअर मास्क तयार करण्यासाठी, नाचणीच्या पावडरमध्ये जास्वंदाचे पाणी आणि आवळा पावडर एकत्र करून पेस्ट बनवा. ही पेस्ट लावल्यानंतर केसांच्या स्काल्पवर मसाज करा.

नाचणी फेस मास्क तयार करण्यासाठी प्रथम नाचणीची बारीक करून त्याची पावडर बनवा. नंतर या पावडरमध्ये दूध आणि गुलाबपाणी मिसळून पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या चेहर्‍यावर आणि मानेवर लावा. त्यामध्ये उपस्थित असलेल्या फिनोलिक आम्ल आणि फ्लेव्होनॉइड चेहऱ्यावरील बारीक रेषा, सुरकुत्या आणि डीप पोर्स बंद करण्याचे काम करतात.

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!

(Eating finger millet flour during corona is more beneficial for health)