मुंबई : तूप हा आपल्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. याचा वापर केल्याने जेवण चवदार होते. तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. वरण, पाळी आणि कोणत्याही भाजीबरोबर आपण तूप खाऊ शकतो. आयुर्वेदानुसार तूप खाल्ल्याने शरीर निरोगी राहते. हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, लोक वर्षभर तूप खातात आणि हे आपल्या आरोग्यासाठी चांगले आहे. (Eating ghee in summer is beneficial for health)
निरोगी चरबीसाठी फायदेशीर
शरीरातील पेशींच्या निरोगी वाढीसाठी निरोगी चरबी आणि उर्जा आवश्यक असते. निरोगी चरबी आपल्या शरीरास पोषकद्रव्ये शोषून घेण्यास आणि महत्त्वपूर्ण हार्मोन्स वाढविण्यात मदत करते. मसूर डाळ आणि भाज्यांमध्ये आपण एक चमचा तूप खाऊ शकतो.
त्वचा हायड्रेटेड राहते
तूपामध्ये मॉइस्चरायझिंग गुणधर्म आहेत जे आपल्याला आतून हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात. विशेषत: उन्हाळ्यात जेव्हा शरीर सहजपणे डिहायड्रेट होते. तेंव्हा तूप खाल्ल्याने तुमची त्वचा मऊ आणि चांगली होते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
आपण जे खातो ते आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. तूप आपले संक्रमण आणि आजारांपासून संरक्षण करते. यात बुटेरिक अॅसिड असते जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. तूपामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व अ आणि सी असते, जे रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
पाचक प्रणाली सुधारते
रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास पाचन क्रिया मजबूत होते. त्यात अँटीफंगल आणि अँटी व्हायरल गुणधर्म आहेत जे रोग रोखण्यात मदत करतात. आयुर्वेदानुसार तूप खाल्ल्याने पाचन तंत्रामध्ये सुधारणा होते आणि त्यात भरपूर पोषक असतात.
शरीर थंड ठेवते
तूप खाल्ल्याने मन शांत होते आणि शरीर थंड होते. कारण तूपात दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे दाह कमी करण्यास आणि शरीर थंड ठेवण्यास मदत करतात. यामुळे उन्हाळ्यात जास्तीत-जास्त तुपाचे सेवन केले पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health Care | हवामान बदलतंय! अशाप्रकारे घ्या आपल्या आरोग्याची काळजी
Hair Fall | मधुमेहामुळे देखील उद्भवू शकते केस गळती, रक्तातील साखर नियंत्रित करणे आवश्यक!#HairFall | #diabetes | #Health | #HealthCarehttps://t.co/GBfureUNxN
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 27, 2021
(Eating ghee in summer is beneficial for health)