पेरु खाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? वाचा याबद्दल अधिक…

| Updated on: Mar 18, 2021 | 12:55 PM

बहुतेक लोकांना पेरु या फळाच्या सर्व फायद्यांविषयी माहिती आहे. पेरु हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

पेरु खाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर? वाचा याबद्दल अधिक...
पेरू
Follow us on

मुंबई : बहुतेक लोकांना पेरु या फळाच्या सर्व फायद्यांविषयी माहिती आहे. पेरु हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरू त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे. पेरूमध्ये फायबर आणि पाणी जास्त प्रमाणात असते. ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरु खावीत. याशिवाय पेरु रक्त शुद्ध करण्याचे कामही करतात. चला तर मग जाणून घेऊयात पेरु खाण्याचे नेमके कोणते फायदे आहेत.  (Eating Guava is beneficial for health)

-उच्च रक्तदाब असणाऱ्यांना डॉक्टर सहसा पेरु खाण्याचे सांगतात. पेरुच्या बियामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते जे रक्त प्रवाह नियंत्रित करते.

-पेरुमध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. पेरूच्या दाण्यांमुळे शरीरातील कार्बोहायड्रेट कमी होते. यामुळे वजन कमी करणे सोपे होते. त्यात आढळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.

-पेरुच्या बियामध्ये प्रथिने अधिक आढळतात. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी कमी होते. टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरु आणि त्याच्या बिया एक चांगला आहार आहे.

-जर आपले केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर पेरूचा रस केसांच्या मुळांवर लावावा. याने केस गळणे काही दिवसांतच थांबेल. तसेच केस चमकदार आणि जाडही होतील.

-जर पेरुच्या पानांचा काढा डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पिण्यास दिला तर, त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित होते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे सर्व त्रास दूर होतात.

-दररोज पेरूची पाने खाल्याने कोलेस्टेरॉल देखील कमी होतो. शरीरात रक्त परिसंचरण चांगले राहते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो.

-पेरु खाल्याने आपले पाचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या देखील कमी होतात.

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!

(Eating Guava is beneficial for health)