हिवाळ्यामध्ये आपल्याला आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. गुळ शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि थंड वातावरणात ऊर्जा देण्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. तसेच हिवाळ्याशी संबंधित अनेक समस्यांपासून बचाव करण्यासही मदत होते. आयुर्वेदामध्ये गुळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे कारण तो नैसर्गिक गोड तसेच पौष्टिकतेचा खजिना आहे. त्यात लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात. गुळ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन क्रिया सुधारते आणि त्वचा उजळण्यासही मदत होते. पण तुम्हाला माहिती आहे का गुळ वेगळ्या पद्धतीने खाल्ल्याने त्याचे फायदे दुप्पट होऊ शकतात. जाणून घेऊ गूळ खाण्याच्या पाच वेगवेगळ्या आणि सोप्या पद्धतीने.
गुळ आणि तिळाचे लाडू
हिवाळ्यात गुळ आणि तिळाचे लाडू खूप फायदेशीर असतात. तीळ शरीराला आतून उबदार ठेवण्यास मदत करते आणि गुळ मिसळल्यास ते आरोग्यासाठी परिपूर्ण असे मिश्रण तयार होते. हे लाडू तुमची एनर्जी वाढवण्यासाठी आणि हिवाळ्यात तुमचे हाडे मजबूत करण्यासाठी उपयुक्त आहेत. गुळ आणि तिळाचे लाडू बनवण्यासाठी फक्त तीळ भाजून त्यात गूळ घालून छोटे छोटे लाडू तयार करा. हे लाडू तुम्ही रोज नाश्त्यात खाऊ शकता.
गुळाचे सरबत
हिवाळ्यात थंड सरबत पिणे सामान्य नसले तरी गरम पाण्यासोबत गुळाचे सरबत पिल्याने तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. हे सरबत डिटॉक्सिफाय करते आणि रक्त शुद्ध करण्यास देखील मदत करते. हे सरबत बनवण्यासाठी फक्त गरम पाण्यात गूळ विरघळून त्यात लिंबाचा रस घालून सकाळी रिकाम्या पोटी प्या. हे खूप फायदेशीर ठरेल.
गूळआणि शेंगदाणा चिक्की
गुळ आणि शेंगदाण्याची चिक्की हा हिवाळ्यातील सर्वात लोकप्रिय नाश्ता आहे. शेंगदाण्यांमध्ये प्रथिने असतात आणि त्यात गुळ टाकल्याने ते चवदार आणि पौष्टिक होते. त्यामुळे शरीराला उष्णता तर राहतेच पण उर्जा ही दीर्घकाळ टिकून राहते. हे तयार करण्यासाठी वितळलेल्या गुळात भाजलेले शेंगदाणे मिक्स करा आणि त्याला काही वेळ सेट होऊ द्या. थंड झाल्यानंतर त्याचे काप करा.
दूध आणि गूळ
गरम दुधात गूळ मिसळून पिणे हा हिवाळ्यात शरीराला आतून उबदार ठेवण्याचा सर्वात सोपा उपाय आहे. हे पचन सुधारते आणि निद्रानाश सारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. हे तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त गरम दुधात गूळ घालून हे झोपण्यापूर्वी प्यायचे आहे. त्यामुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल आणि शांत झोप लागेल.
पोळी आणि गूळ
हिवाळ्यात गूळ आणि तूपासह पोळी खाणे हे अत्यंत फायदेशीर मानले जातात. हे केवळ चाविलाच चांगले लागते असे नाही तर शरीराला यामुळे ऊर्जा आणि पोषण देखील मिळते. पोळीवर थोडे तूप लावून तुम्ही खाऊ शकतात. तुम्ही ते तुमच्या जेवणात किंवा नाष्टामध्ये समाविष्ट करू शकता.
गुळ खाण्याचे फायदे
रोगप्रतिकार शक्ती वाढवते: गुळातील अँटिऑक्सिडंट आणि खनिजे अवयव मजबूत करतात. त्यामुळे तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
पचनक्रिया सुधारते: हे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी गुळाचे सेवन करणे आवश्यक आहे.
ऊर्जा प्रदान करते: गुळ शरीराला त्वरित ऊर्जा प्रदान करतो आणि हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण करण्यास मदत करतो. त्यामुळे हिवाळ्यासाठी गुळ हे सुपर फूड मानले गेले आहे.